You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळस विभागीय अध्यक्ष अवधूत मराठे यांचे ग्रा. प. कार्यालय समोर उपोषण

राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळस विभागीय अध्यक्ष अवधूत मराठे यांचे ग्रा. प. कार्यालय समोर उपोषण

राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळस विभागीय अध्यक्ष अवधूत मराठे यांचे ग्रा. प. कार्यालय समोर उपोषण

वेंगुर्ले

वेंगुर्ले तुळस येथे वनोषधी झाडाच्या मुळांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय आदीवासी लोकांनां पाठीशी घालणारऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात वेळोवेळी निवेदने देऊन व ग्रामसभेत सुचित करुन सुद्धा प्रशासन काहीही कारवाई केली नाही. यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळस विभागीय अध्यक्ष अवधूत मराठे तुळस ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसले आहेत.

त्यांनां पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्षा सौ.नम्रता कुबल यांच्या सह जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कुबल, तालुका अध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, महिला अध्यक्षा सौ.दीपिका राणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेंगुर्ले चा पाठिंबा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =