स्टेटस वरुन कणकवलीत काही काळ वातावरण तंग
कणकवली –
कणकवली लगतच्या एका गावातील रिक्षा चालकाने आपल्या स्टेटसवर धार्मिक तेढ निर्माण होणारा स्टेटस ठेवल्याच्या रागातून भाजपाचे कार्यकर्ते कणकवली शहराच्या मुख्य चौकात गोळा झाले.त्या ठिकाणी जोरदार जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.तुम्ही तक्रार द्या,आम्ही गुन्हा दाखल करतो.वाद नको,अशी विनंती केली. मात्र अर्धा तास पोलीस आणि जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती. अधून मधून जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ते करीत होते. मात्र, त्या तरुणाच्या घराकडे जाऊन त्या तरुणाने ठेवलेल्या स्टेटसच्या वादावर माफी मागावी अशी मागणी भाजपा पदाधिकारी यांनी केली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलीस बंदोबस्त वाढ करण्यासाठी राखीव पोलीस दलाची तुकडी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यावेळी भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष सोनू सावंत, महेश गुरव, मिलिंद मेस्त्री,राजश्री धुमाळे ,सदानंद चव्हाण आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्या युवकाने माफी मागावी!
कणकवली लगतच्या त्या गावातील युवकाने आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवताना चार शहरांचा उल्लेख केला होता यातून धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी केला.कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात एकत्र येत त्या युवकाला आमच्यासमोर हजर करा ,त्याने जाहीररित्या माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली .यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला होता. त्यानंतर हे भाजपा कार्यकर्ते त्या गावाच्या दिशेने रवाना झाले .तेथे त्या युवकाकडून माफी घेण्यात आल्याचे समजते.