You are currently viewing ओटवणे गावचे सुपुत्र प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर…

ओटवणे गावचे सुपुत्र प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर…

ओटवणे गावचे सुपुत्र प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर…

सावंतवाडी

ओटवणे गावचे सुपुत्र तथा मुंबईतील कांदिवलीचे पोलीस उपनिरिक्षक प्रकाश महादेव परब यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. गावच्या सुपुत्राला राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याने ओटवणे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई विभागात १९८८ मध्ये प्रकाश परब दाखल झाले. यादरम्यान त्यांनी दादर, चुनाभट्टी, येलोगेट, कुर्ला, बोरिवली, गोरेगाव, एम एच बी या पोलिस स्थानकात त्यांनी सेवा बजावली. उपनिरीक्षक प्रकाश परब सध्या कांदिवली पोलीस स्थानकात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रकाश परब यांच्या त्याच्या ३६ वर्षातील उत्कृष्ट, प्रामाणिक व उल्लेखनिय निस्वार्थी सेवेसाठी त्यांना हे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. रविवारी होणाऱ्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात येते. त्यानुसार प्रकाश परब यांच्या आजपर्यंतच्या गौरवशाली सेवेची दखल घेऊन त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.
प्रकाश परब यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंत शिक्षण मुंबईतच झाले. त्यांचे वडील महादेव परब यांनीही पोलीस खात्यात हवालदार म्हणून सेवा बजावली होती. त्यांचाच वारसा पुढे चालवत प्रकाश परब मुंबई पोलीस दलात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत.
ओटवणे गावाच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. ओटवणे ग्रामस्थ मंडळा( मुंबई) चे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा