You are currently viewing नवी मुंबईतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ‘भारताचे संविधान’ हे व्याख्यान संपन्न

नवी मुंबईतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ‘भारताचे संविधान’ हे व्याख्यान संपन्न

नवी मुंबई :

 

यशवंतराव चव्हाण ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नवी मुंबईतील घणसोली शाखेच्या माध्यमातून संविधान बांधिलकी महोत्सवा निमित्त “भारताचे संविधान “या विषयावर एक व्याख्यान संपन्न झाले.

या व्याख्यानाला महाविद्यालयातील युवा विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण तळणीकर, प्राध्यापक कविता शिंदे मॅडम, प्राध्यापक पुनम नलावडे मॅडम, प्राध्यापक लक्ष्मी कटारे मॅडम, प्राध्यापक स्मिता गांगुर्डे मॅडम हे सर्वजण उपस्थित होते.

भारताचे संविधान भारतीयांचा मानवतेच्या मार्गाने जाण्याचा महामार्ग आहे. लोकशाही राज्याची उत्तम संहिता म्हणून भारतीय संविधानाकडे पाहिजे जाते.

समाजवादी तत्वामुळे समाजातील सर्व घटकांचा विचार करून व्यवस्थेचे नियोजन केले जाते. देशातील उपलब्ध सोयी सुविधा दुर्बल व दुर्लक्षीत घटकांना सर्वांसोबत मिळण्याची तरतूद संविधानात आहे.

संविधानात नागरिकांना हक्क दिले आहेत; त्याबरोबर कर्तव्य पालनाची सुध्दा जबाबदारी दिली आहे. म्हणजे आपण आपल्या देशातील साधन संपत्तीचा वापर करतो; तसेच त्या साधन संपत्तीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.

नागरिकांतील भेदभाव नष्ट होऊन एकोपा निर्माण होईल असा समन्वय संविधानाने साधला आहे. विविध समाज घटकांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीसह देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी संविधानात आहे.

आपल्या जीवनशैलीत संविधानाला सर्वोच्च स्थान देऊन जबाबदार नागरीक होऊया असा संदेश देण्यात आला. व्याख्यानात मह.अंनिस. कार्यकर्ते अशोक निकम, उत्तम रोकडे व गजानंद जाधव यांनी मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा