“धार्मिक तेढ” प्रकरणी वेंगुर्लेतील एकाला ३ दिवसाची पोलीस कोठडी…
संतप्त नागरिकांकडून दुकानांची तोडफोड; तब्बल अडीचशे जणांवर गुन्हा दाखल…
वेंगुर्ले
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलीसांनी जाफर शेख याला अटक केली आहे. तर या प्रकारानंतर काल रात्री निर्माण झालेल्या वादा नंतर संतप्त जमाव करून दुकानांची, हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली तसेच घरांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी २०० ते २५० जणांवर येथील पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचा भंग करीत बेकायदा जमाव करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांनी दिली. तर याप्रकरणी शेख याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता ३ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा स्टेटस सोशल मीडियावर ठेवण्याच्या रागातून निर्माण झालेल्या वादामुळे मोठ्या संख्येने हिंदू बांधव काल रात्री वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे गोळा झाले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी सर्वांची मागणी होती. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली. दरम्यान काल संतप्त झालेल्या वेंगुर्लेतील काही नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत त्या ठिकाणी आपला राग व्यक्त केला. तत्पुर्वी रात्री संतप्त जमावाकडून शहरातील दुकाने, हातगाडया फोडण्यात आल्या काही घरांवर दगड फेक करण्यात आली.या प्रकरणी ठपका ठेवून २०० ते २५० जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात लक्ष्मीप्रसाद मांजरेकर, मिनाद नाईक, प्रज्वल पालव, सिद्धेश ढवळे, मयुर आंगचेकर, यश गावडे, दुर्गेश आडारकर, प्रणव गवंडे, किरण गिरप यांच्यासह २०० ते २५० जणांचा समावेश आहे.
त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मनाई आदेशाचा भंग करुन बेकायदेशिर जमाव करुन बाजारपेठतील दुकाने व हातगाडयांची तोडफोड व गवळीवाडा येथील घरावर दगड मारून नुकसान केल्या प्रकरणी तसेच इतरांचे जिवित व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणारी कृती केल्याचा ठपका ठेवून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान वेंगुर्ले शहरासह तालुक्यात शांतता राखली जावी यासाठी पोलिसांनी सकाळी शहरातून संचलन केले. त्या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांच्या उपस्थितीत आज वेंगुर्ले पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेतली यावेळी वेंगुर्ले व्यापारी संघ अध्यक्ष विवेक खानोलकर, शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डुबळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जमातुल मशीद ट्रस्ट वेंगुर्ले चे शब्बीर गोलंदाज, सिद्दीक गोलंदाज, कॅम्प मशीद अध्यक्ष नेहाल शेख, सेक्रेटरी इमरान शेख, हमीद शेख, महमंदअली मुल्ला, महमंदसलिम मुल्ला, सईद शेख, फकीर नाईक, ह्यातखाब मकानदार, रफिक शेख, काँग्रेस चे सिध्देश परब, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप, राष्ट्रवादीच्या नम्रता कुबल, संजय गावडे, बाबुराव खवणेकर, वामन कांबळे यांच्या सह शांतता समितीचे सदस्य आणि प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप भोसले, पोलीस निरीक्षक अतुल जाधव आदी उपस्थित होते. यावेळी या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर ही पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, असे आवाहन केले आहे.
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*