बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे “माझ्या मनातील राम’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन
मालवण
येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे “माझ्या मनातील राम’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी जास्तीत जास्त ५०० पर्यंत शब्द मर्यादा आहे. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १५०१, १२०१, १००१ रुपये व प्रत्येकी प्रशस्तीपत्र तसेच उत्तेजनार्थसाठी ५०० रुपयांची ५ पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धा.खुली असून १० वर्षांवरील व्यक्तीला सहभागी होता येईल. आपले निबंध २८ जानेवारीपर्यंत दीपक भोगटे, मोबाईल – ९४२३८३३१६३ या नंबरवर व्हॉट्सअॅप करावेत. किंवा advddp@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. पारितोषिक समारंभ ३० जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा येथे होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सेवांगणतर्फे करण्यात आले आहे.