अवधूत मराठे यांचे २६ रोजी उपोषण
वेंगुर्ले,
तुळस होडावडा सीमावर्ती भागामध्ये काही परप्रांतीय लोक राहत असून त्यांच्याकडून समाज विघातक कृत्ये होत असल्याने अशा लोकांचा शोध घेऊन त्यांची माहिती शासनाला द्यावी, अशी मागणी तुळस ग्रामपंचायतीकडे करुनही ग्रा. पं. ने त्याची दखल न घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळस विभागीय अध्यक्ष अवधूत गजानन मराठे हे २६ जानेवारी रोजी तुळस ग्रा. पं.समोर उपोषणास बसणार आहेत, असे निवेदन त्यांनी तुळस सरपंच, तहसीलदार, वेंगुर्ले गटविकास अधिकारी व संबंधितांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आपण तुळस वेशीवाडी येथे राहत असून तुळस होडावडा या सीमावर्ती भागामध्ये परप्रांतीय लोकांची चार- पाच कुटुंबे राहतात. त्यांचा घंदा मौलमजुरी असला तर आम्ही समजू शकतो. पण त्यांचे उद्योग हे समाज विघातक तसेच देशहिताला बाधक आहेत. ८ डिसेंबर २३ रोजी तुळस बेतवाडी येथील डोंगरामध्ये सप्तरंगी बनौषधी झाडांच्या मुळांची तस्करी करताना पाच आदिवासी लोकांना वनविभागाने पकडले. तरीही हे आदिवासी लोक गेली २ वर्षे एका इसमाच्या जमिनीमध्ये वास्तव्यास आहेत. हा विषय मागील ग्रामसभेत चर्चेला घेण्यात आला होता. मात्र, ग्रामपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती.या लोकांमुळे गावातील वन्यजीव धोक्यात आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थी आदींना धोका आहे. या संदर्भात निवेदन देऊनही त्याची दखल. अद्यापपर्यंत घेण्यात आली नसल्याने आपण शुक्रराार २६ जानेवारी रोजी तुळस ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे, असा इशारा मराठे यांनी दिला आहे.