You are currently viewing सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी तृतीयपंथीय समाजाचे सर्वेक्षण केले जाणार

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी तृतीयपंथीय समाजाचे सर्वेक्षण केले जाणार

 – सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जे.एम.चाचरकर                            

सिंधुदुर्गनगरी 

तृतीयपंथी समाजाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी तृतीयपंथीय समाजाचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जे.एम. चाचरकर यांनी दिली.

     शासनाने आदेशित केल्याप्रमाणे तृतीयपंथी समाजाचे सर्वेक्षणाअंतर्गत त्यांचे वैयक्तीक,निवास, स्थलांतरण विषयक माहिती, शिक्षण विषयक माहिती, आवश्यक कागदपत्रे माहिती, कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती विषयक माहिती, शासनाकडुन लाभ मिळालेल्या योजना विषयक माहिती, आरोग्य विषयक माहिती देण्यासाठी तृतीयपंथीयांनी समक्ष सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे भेट देवून योजनेविषयक  अर्ज व संबंधित कागदपत्रे सादर करावीत. असे आवाहन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जे.एम. चाचरकर यांनी केले आहे. समक्ष भेटण्यासाठी कार्यालयाचा पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, “अ विंग “, सिंधुदुर्गनगरी ओरोस, ता. कुडाळ पीन कोड-416812 दूरध्वनी क्रमांक 0262-228882

प्रतिक्रिया व्यक्त करा