इन्सुलीत २९४० स्क्वेअर फुट मध्ये साकारली प्रभू श्री. रामचंद्राची भव्य रांगोळी
इन्सुली
इन्सुली येथील उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने तब्बल २९४० स्क्वेअर फुट मध्ये प्रभू श्री रामचंद्रांची भव्य रांगोळी साकारली आहे. ७० फूट लांब व ४२ फूट रुंद अशा या प्रतिकृतीसाठी ६०० किलो हून अधिक रांगोळी वापरण्यात आली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी इन्सूलीतील दहाहून अधिक रांगोळी कलाकारांनी तीन दिवस मेहनत घेतली.
अयोध्येत श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने इन्सुली गावात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. गावातील उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी प्रभू श्रीरामचंद्राची भव्य दिव्य रांगोळी साकारण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार रांगोळी कलाकार सुषमा पालव, अनिरुद्ध पालव, नारायण मुळीक, विशाल पालव, प्रिया नाटेकर, अलिषा परब, स्वागत नाटेकर, विकास पेडणेकर, सलाम आदी कलाकारांनी गेले तीन दिवस ही रांगोळी साकारण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. यासाठी उत्कर्ष कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नितीन राऊळ, सचिव रामचंद्र नाईक, रामचंद्र पालव यांच्यासह सर्वच सदस्यांनी सहकार्य केले. ही रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी होत आहे