You are currently viewing स्व. शिवरामराजे भोंसले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण संपन्न…

स्व. शिवरामराजे भोंसले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण संपन्न…

स्व. शिवरामराजे भोंसले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण संपन्न…

सावंतवाडी

येथील संस्थानचे तत्कालीन राजेसाहेब स्वर्गीय लेफ्टनंट कर्नल हि. हा. शिवरामराजेसाहेब भोंसले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण नुकतेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेद्वारा करण्यात आले. यानिमित्त आज सकाळी शिवराम राजेसाहेब भोंसले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, राणीसाहेबा शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, तसेच सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा यांसह अनेक सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या शुभ हस्ते शिवरामराजे भोंसले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.
यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जी. ए. बुवा यांनी स्वर्गीय शिवरामराजेसाहेब भोंसले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उपस्थितांना सांगितले. डॉ. बुवा म्हणाले शिवरामराजे हे रयतेचे खरे राजे होते. आमदार असताना ते जेव्हा मंत्रालयात प्रवेश करत तेव्हा केवळ त्यांचे नाव ऐकून अनेक मंत्री तसेच दस्तर खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री देखील त्यांना येऊन सन्मानाने त्यांची भेट घेत. तसेच राजेसाहेब यांनी आणलेल्या जनतेच्या विविध प्रश्नांना मार्गी लावत असत. संस्थानकालीन ही परंपरा अनेकांना आदर्शवत असल्याचेही डॉ. बुवा म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा. शैलेश नाईक यांनी केले.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, अनारोजिन लोबो, पुंडलिक दळवी, भारती मोरे, साक्षी वंजारी, समीर वंजारी, समिरा खलील, हेलन निब्रे, महेश परुळेकर, संजय पेडणेकर, उमाकांत वारंग, दत्तप्रसाद गोठोसकर, मिलिंद सुकी, शुभांगी सुकी, दीपाली भालेकर, प्रा. डॉ. देविदास बोर्डे, फ्रान्सिस रॉड्रिक्स, दिलीप पवार, रूपाली मुद्राळे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा. रुपेश पाटील, श्री . बांदेकर, बंटी माठेकर, सौ. मठकर, नंदकिशोर कोंडये यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा