You are currently viewing आसाम राज्यामधील ‘युवा संगम’ मध्ये सिंधुदुर्गची भाग्यश्री मांजरेकर करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

आसाम राज्यामधील ‘युवा संगम’ मध्ये सिंधुदुर्गची भाग्यश्री मांजरेकर करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

आसाममध्ये कार्यक्रम : आय. आय.टी गुवाहाटी करणार अभ्यास दौऱ्याचे नियोजन : २२ राज्याचा सहभाग : महाराष्ट्रासह अन्य ठिकाणच्या ५० विद्यार्थ्याची निवड

 

मालवण :-

भारत सरकारच्या गृहमंत्रालय, सूचना एव प्रसारण मंत्रालय, शिक्षा मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, माहिती प्रसारण मंत्रालय, एआयसीटी, भारतीय रेल्वे मंत्रालय, आयआरसीटीसी व पूर्वोतर व्यवहार मंत्रालय, व देशभरातील नामांकित आयआयटी, एनआयटी, आय.आय.एम, बनारस हिंदू विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, ट्रिपल आयटी रांची , सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्रप्रदेश, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिझाइन अँड मॅन्युफॅक्चरिंग , यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा संगम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १३ ते २४ जानेवारी दरम्यान आसाम येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाग्यश्री जनार्दन मांजरेकर यांची निवड महाराष्ट्रातून युवा प्रतिनिधी म्हणून करण्यात आली आहे. एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत भारतातील २२ राज्य ते भारतातील इतर राज्यातील युवकांचा युवा संगम होत आहे. सिंधुदुर्गमधील भाग्यश्री मांजरेकर ५० युवांसह महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या कार्यक्रमात तरुणांना एकमेकांच्या परंपरा, संस्कृती, निसर्ग, चालीरीती कळतील, यामुळे तरुणांना एकमेकांची संस्कृती आणि परंपरा समजून घेण्याची संधी मिळेल. एक भारत श्रेष्ठ भारताची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये सरदार वल्लभाई पटेल यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त केली होती. भारताची एकता, शांतता आणि सौहार्दासाठी जगभरात ओळख आहे. त्यामुळे हा उपक्रम लोकांना एकमेकांशी जोडून देशभर एकता, शांतता आणि सद्भावना वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.आसाम मध्ये होणाऱ्या युवा संगम साठी येणारे युवक हे १८ ते ३० वर्ष वयोगटातील आहेत. या युवा संगम दरम्यान युवकांना देशातील पाच व्यापक क्षेत्र पर्यटन, परंपरा, प्रगती, प्रद्योगिक आणि परस्पर संपर्क याबद्दल बहुआयामी अनुभव मिळेल, महाराष्ट्रातून ४० युवा व दादरा नगर हवेली, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील १० विद्यार्थ्यांची निवड झाली असून ते महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. महाराष्ट्रातील युवकांचा युवा संगम सावित्रीबाई फुले विद्यापीठ व आय.आय.टी गुवाहटी करणार आहे. भाग्यश्री मांजरेकर ही स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणची माजी विदयार्थी असून युवा संगममध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झाल्याबद्दल समस्त सिंधुदुर्गवासीयांनी भाग्यश्रीचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा