You are currently viewing श्रीराम….

श्रीराम….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*श्रीराम….*

ध्यानी राम, मनी राम ,
अंतरंगी आत्माराम !
जाणीव त्याची सदैव,
ठेवी मनात श्रीराम !….१

बालरूप ते वाढले,
अयोध्येस श्रीरामाचे!
वशिष्ठ आश्रमी झाले,
संगोपन राघवाचे!….२

राजाराम सर्वांसाठी,
प्रिय होऊन राहिला !
अयोध्येच्या सिंहासनी,
राजा बनण्या तो आला!….३

कैकयीच्या आदेशाने,
वनवासी राम गेला !
कर्तव्या तो न चुकला,
आदर्श जनात झाला !….४

आदर्श पुत्र न् राजा,
बिरूदे त्या प्राप्त झाली!
श्रीराम अवताराने ,
भूमी संपन्न झाली.!…५

दीर्घ काळ हा जाहला,
मंदिर उभारण्याला !
भाग्य असे हे आमचे,
मिळेल ते बघण्याला!..६

सजे अयोध्या नगरी,
अभिमान , गौरवाने !
कीर्ती पसरे देशाची,
श्रीरामाच्या वास्तव्याने !…७

‘श्रीराम’ तारक मंत्र ,
प्रत्येक जागवी मनी!
श्रीरामाचा नामघोष ,
आनंद देई जीवनी !….८

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा