You are currently viewing सिंधुदुर्गात २३ जानेवारीला सागर परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन…

सिंधुदुर्गात २३ जानेवारीला सागर परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन…

सिंधुदुर्गात २३ जानेवारीला सागर परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन…

मालवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या प्रेरणेतून मच्छीमारांच्या कल्याणासाठी व समग्र विकासाकरिता समर्पित भारत सरकार द्वारे २३ जानेवारीला सिंधुदुर्गात सागर परिक्रमा कार्यक्रम होणार आहे. यात सकाळी ११ वाजता देवगड येथील आनंदवाडी बंदर प्रकल्पाच्या ठिकाणी तर सायंकाळी ४ वाजता मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे मेळावा होणार आहे.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय केंद्रीय मंत्री परशोत्तम रूपाला, लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह राज्यमंत्री डॉ. श्री. एल. मुरुगन, डॉ. संजीव कुमार बल्यान, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार वैभव नाईक, नितेश राणे, मत्स्य व्यवसाय खात्याचे सचिव डॉ. अभिलाष लेखी, राष्ट्रीय मत्स्यिकी विकास बोर्ड हैदराबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एल. एन. मूर्ती, मत्स्य व्यवसायचे सहसचिव नीतूकुमारी प्रसाद, मत्स्यव्यवसायचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित राहणार आहेत. तरी मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मत्स्य व्यवसाय खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा