मनसेच्या वतीने २२ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन…
बांदा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने २२ जानेवारीला विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल मँगो येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे येथील बैठकीत दिलेल्या आदेशानुसार २२ जानेवारीला राम मंदिर प्रतिष्ठापना आणि राम मंदिरासाठी ज्या कारसेवकांनी बलिदान दिले आहेत त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सावंतवाडी तालुका बैठक आज मँगो हॉटेल सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये २२ ला सकाळी ११ वाजता राम मंदिर पानवळ बांदा येथे भाविकांना सरबत वाटप कार्यक्रम, तसेच दुपारी १२:३० वाजता सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगर हनुमान मंदिर येथे महाआरती, मळेवाड हनुमान मंदिर या ठिकाणी मिठाईवाटप कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तसेच ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भगवाधारी होर्डिंग लावण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष केतन सावंत, उपतालुकाध्यक्ष अतुल केसरकर, राजेश मामलेकर, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे, तळवडे जिल्हा परिषद उपविभाग अध्यक्ष राकेश परब, माजी शहराध्यक्ष सावंतवाडी सतीश आकेरकर, साहिल तळकटकर, नितेश दळवी, अनिकेत दळवी आदी उपस्थित होते.