You are currently viewing मुंबई केंद्रातून ‘सत्य जे विलुप्त’ प्रथम

मुंबई केंद्रातून ‘सत्य जे विलुप्त’ प्रथम

*२० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

२० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून चिल्ड्रन्स अकॅडमी, मालाड या संस्थेच्या ‘सत्य जे विलुप्त’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच साई स्पर्श संस्था, ठाणे या संस्थेच्या ‘ये गं ये गं परी !’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

 

दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक अनिकेत भोईर (सत्य जे विलुप्त), द्वितीय पारितोषिक वैभव उबाळे (ये गं ये गं परी !), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक शंतनु साळवी (सत्य जे विलुप्त), द्वितीय पारितोषिक सिध्देश नांदलस्कर (पॅडल), नेपथ्य: प्रथम पारितोषिक सिध्दार्थ ठाकूर (ये गं ये गं परी !), द्वितीय पारितोषिक किरवली ग्रामस्थ (पूर्णब्रम्ह), रंगभूषा प्रथम पारितोषिक मयुरी जवंजाळ (फुलवा मधुर बहार), द्वितीय पारितोषिक उदय तांगडी (इंडिया घर), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक गौरांग शमी (सत्य जे विलुप्त) आणि शरयू गोसावी (ये गं ये गं परी !), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे स्वरा जाधव (सत्य जे विलुप्त), स्वरा सावंत (पॅडल), अदिती धामणस्कर (कणा), गिरीजा राऊत (अजब लोठ्यांची महान गोष्ट), सई जहागीरदार (फुलवा मधुर बहार), अमोघ डाके (काजवे), वरद पाटील (अजब लोठ्यांची महान गोष्ट), गंधार मुळ्ये (पॅडल), काव्य चौधरी (बुढ्ढी के बाल), देवांश खेंगले (इंडिया घर).

 

साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे दि. ९ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वैदेही चवरे, संग्राम भालकर आणि शेखर वाघ यांनी काम पाहिले. तसेच समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, तिथी घाडी, मुकुंद जोशी यांनी उत्तमप्रकारे जबाबदारी सांभाळली.

 

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम आणि द्वितीय आलेल्या बालनाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी आणि कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा