पोलीसांची भिती न बाळगता अपघातग्रस्तांना मदत करा… अतिरिक्त पोलीस अधिक्षक ऋषिकेश रावले
सिंधुदुर्गनगरी :
रस्त्यावर अपघात होतात तेव्हा त्या अपघातातील वाहनचालक आणि इतरांना मदत करणे आवश्यक आहे. पंरतु कोणीही मदत करायला पुढे येत नाही. पोलीस आपल्याला अडकवतील असा समज करुन कोणी मदत करत नाही. तर अपघातग्रस्तांना मदत करा. पोलीसांच भय बाळगण्याच कारण नाही. अपघातानंतर जखमीवर तात्काळ उपचार होणे आवश्यक असते. ती मदत करताना घाबरु नका. अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल तुमच कौतुकच होइल असे स्पष्ट मत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील मोटार वाहन विभाग उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रस्ता सुरक्षा अभियान उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. रस्यांवर होणारे अपघात त्याचे वाढत जाणारे प्रमाण चिंताजनकच आहे. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना वेळी मदत मिळत नाही. मदत केली, खबर दिली तर पोलीस त्रास देतील हि सर्व सामान्यांच्या असणाऱ्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी मार्गदर्शन करताना जी माहिती दिली जे आवाहन केले ते अधिक महत्त्वाचे आहे.न्यायालयानेही यासंदर्भात निवाडा दरम्यान दिलेल्या आदेशासंबधीही अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.रावले यांनी उल्लेख केला. . जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपजिल्हाधिकारी सुकटे,कार्यकारी अभियंता सर्वगोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, शिक्षणाधिकारी श्री. कुडाळकर, एस. टी. चे विभाग नियंत्रक श्री. पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीमती नदाप तसेच मोटर वाहन निरीक्षक संदिप भोसले, सचिन पोलादे,अतुल चव्हाण, स. मोटार वाहन निरीक्षक अमित पाटील अतुल चव्हाण, रत्नकांत ढोबळे, विनायक सपकाळ आदी उपस्थित होते.