‘उत्तराची चौकट मोडताना’ या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक
मालवण :
मालवण तालुक्यातील दुर्गम भागातील पडेकाप या पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक नवनाथ पांडुरंग भोळे यांच्या ‘उत्तराची चौकट मोडताना’ महा शैक्षणिक उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने प्रकाशित केलेल्या शिक्षणगाथा जानेवारी 2024 या त्रैमासिकासाठी या शैक्षणिक उपक्रमाची निवड झाली आहे. महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त मान श्री. सुरज मांढरे यांच्या संकल्पनेतून शिक्षणगाथा हे त्रैमासिक साकारले असून यात संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनव शैक्षणिक उपक्रमाची दाखल घेण्यात येते, जेणेकरून महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ते उपक्रम मार्गदर्शक ठरावेत.
याबाबत आमच्या प्रतिनिधींनी श्री भोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुलांना अनेक प्रश्न पडतात हे का? हे कसे? प्रश्नातील ही जिज्ञासूवृत्ती अध्यापन करताना वापरावयास हवी असे वाटले. तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना जास्तीत जास्त उत्तरे कशी देता येतील याचा प्रयत्न केला. मुलांना सुरुवातीला एखाद्या वस्तूवर,पदार्थांवर प्रश्न तयार करायला लावले. तेव्हा त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार खूप छान प्रश्न तयार करू लागली. त्यांच्या वागण्या बोलण्यात सहजता आली. त्यांची भीती कमी झाली. आता काही प्रश्नांची उत्तरे मुले स्वतः शोधायचा प्रयत्न करतात. या कामी शाळेतील सहशिक्षक श्री राजेंद्रप्रसाद गाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आणि त्याच शैक्षणिक उपक्रमात मी लिहिलेला ‘उत्तराची चौकट मोडताना’ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या वरील त्रैमासिकात माझा उपक्रम निवडला म्हणून मी बालभारती परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. यामुळेच माझ्या पडेकाप या दुर्गम शाळेतील उपक्रम महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शाळांमध्ये पोहोचण्यास मदत होणार आहे.
नवनाथ भोळे यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती पडेकाप, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मालवण, साने गुरुजी कथामाला व कोमसाप मालवण यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
*संवाद मिडिया*
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗
*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻♀️संधीचा लाभ घ्या🤩
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४
*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी
♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४
*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा
👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*
👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील
👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)
👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता
👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल
👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳
👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜
👉 *Personal attention with hands on practice*
👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗
📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*