You are currently viewing लघुचित्रपट स्पर्धेस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

लघुचित्रपट स्पर्धेस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

लघुचित्रपट स्पर्धेस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

जल जीवन मिशन अंतर्गत खुल्या गटाकरीता लघुचित्रपट स्पर्धाचे दि.१५ जानेवारी २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आले होते. मात्र या स्पर्धेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने या स्पर्धास दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले लघुचित्रपट जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सादर करण्याचे  आवाहन  जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  विनायक ठाकुर यांनी केले आहे.

जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिध्दी करीता जिल्हास्तरीत खुल्या लघुचित्रपट स्पर्धाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकानी लघुचित्रपटाची निर्मिती स्वता केलेली असावी. पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्वसंगित, गीत, चित्रिकरण स्वता केलेले असावे. या अगोदर प्रकाशीत झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकिय विभाग त्यानी त्याच्या कामाकरीता तयार केलेले लघुचित्रपट या स्पर्धेकरीता सादर करण्यात येऊ नयेत. लघुचित्रपट निर्मिती करीता वापरण्यात आलेले साहित्य प्रोफेशनल दर्जाचे व उत्तम असावे. लघुचित्रपट निर्मिती करीता वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावनारे नसावे, या स्पर्धेकरीता ३ ते ५ मिनिट कालावधीचा लघुचित्रपट तयार सादर करावयाचा आहे. कॉपी राईट उल्लघन होत नसलेबाबत स्वयंघोषणापत्र स्पर्धकांनी स्वता द्यावयाचे आहेत.

या स्पर्धेकरीता लघुचित्रपटाचे विषय- १. पाण्याचे शाश्वत स्रोत २. पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती ३. जल संवर्धन ४. हर घर जल घोषित गाव ५. जल जीवन मिशन यशोगाथा ६. विविध योजनांचे कृती संगम प्रमाणे आहेत. तर स्पर्धेकरीता बक्षिस रक्कम रुपये प्रथम क्रमांक- ३१०००/- व्दितिय क्रमांक-२१०००/- व तृतिय क्रमांक – ११०००/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र अशी असणार आहे. या स्पर्धेकरीता जमा करण्यात आलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र व निवडिचे अधिकार प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे असतील.

जिल्हास्तरीत खुल्या लघुचित्रपट स्पर्धेत जिल्ह्यातील लघुचित्रपट निर्माते यांनी सहभाग घेऊन आपले लघुचित्रपट दिनांक ३० जानेवारी २०२४ पर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करावेत. अधिक माहिती करीता श्री. प्रविण काणकेकर, दुरध्वनी क्रमांक ९४०३३५०४५५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषद (पाणी व स्वच्छता) विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा