You are currently viewing फोंडाघाट येथून १ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे सात टायर्स चोरीस

फोंडाघाट येथून १ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे सात टायर्स चोरीस

फोंडाघाट येथून १ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे सात टायर्स चोरीस

फोंडाघाट :

हवेलीनगर येथील टायर्स पंक्चर काढण्याच्या सेंटरमधून तीन वाहन चालकांनी त्यांच्या वाहनासाठी बसविण्यासाठी आणून ठेवलेले सात टायर्स अज्ञात चोरट्याने सोमवारी रात्री चोरून नेले. त्याची किंमत १ लाख ३२ हजार रूपये होती अशी फिर्याद फोंडाघाट-हवेलीनगर येथील मोहम्मद हैदर केयामुद्दीन यांनी कणकवली पोलिसात दिली आहे.

विजय लक्ष्मण काथरूड यांनी त्याच्या डंपरसाठी तर बाळकृष्ण शिंदे व प्रकाश गोरूले यांनी त्याच्या ट्रकसाठी नवीन सात टायर बसविण्यासाठी मोहम्मद केयामुद्दीन यांच्याकडे (हवेलीनगर) आणून दिले होते. दि. ८ जानेवारी पासून वेगवेगळया वेळी एकूण सात टायर्स ट्यूब व फ्लॅक आणून दिले होते. काल रात्री २ वा.च्या सुमारास एका ट्रकमध्ये सदरचे टायर भरून अज्ञात चोरट्याने चोरून नेले. तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये टायर भरताना दिसत आहे. परंतु त्यांचे चेहरे ओळखता येत नाहीत. गाडीचा नंबर अद्यापही फुटेजमध्ये आढळून आला नाही. सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे व्यवस्थित बसवावेत फोंडाघाट शहरात आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. परंतु ते योग्य पद्धतीने बसविण्यात आलेले नाहीत. हवेलीनगर-फोंडाघाट येथे टायर्स चोरीची कालची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली दिसत आहे. ट्रकमध्ये ठेवलेले टायर्स दिसतात.

परंतु टायर भरणाऱ्या चोरट्यांचे चेहरे दिसत नाहीत. त्या व्यक्ती ओळखता येत नाही. सदरच्या ठिकाणी बसविलेले कॅमेरे उंचावर बसविल्याने गाडीचा नंबरही कैद झाला नाही. त्यामुळे सदरचे कॅमेरे व्यवस्थित बसविण्यात यावेत अशी मागणी फोंडाघाटवासियांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा