साकेडीत विविध विकासकामांचा आमदार नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ…!
कणकवली
साकेडी गावातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, सरपंच सुरेश साटम, उपसरपंच प्रज्वल वर्दम, सोनू सावंत, संदीप सावंत, भाई आंबेरकर, माजी सभापती संजय शिरसाट यांच्यासह ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
हुंबरट ते साकेडी रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्यासाठी ९७ लाख, करूळ ते साकेडी रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी २२ लाख, साकेडी मुख्य रस्ता ते गावणकर घरापर्यंत खडीकरण व डांबरीकरणासाठी ५ लाख, साकेडी मुख्य रस्ता ते मुस्लिमधाडी मशिद रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी १५ लाख, साकेडी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारत बांधण्यासाठी १२ लाख, जल जीवन मिशन अंतर्गत साकेडी तांबळवाडी ते
बाघोपेवाडी-मुस्लिमधाडीसाठी ८३ लाख, जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणी,वरचीवाडी-फौजदारवाडी-बोरीचीवाडी नळयोजनेसाठी ३८ लाखख, साकेडी मुख्य रस्ता ते स्मशानभूमी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी १५ लाख एवढा निधी मंजूर झाला याशिवाय साधेडीत बीएसएनएलचा टॉवर मंजूर झाला आहे. ही कामे आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.