कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा झाराप नंबर १ शाळेचा १२५ वर्षापूर्ती वर्धापन दिनानिमित्त “माजी विद्यार्थी मेळावा, वार्षिक बक्षीस वितरण सोहळा व स्नेहसंमेलन सोहळा बुधवार दि. १७ जानेवारी व गुरुवारी दि. १८ जानेवारी या दिवशी संपन्न होणार आहे.
बुधवारी १७ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता उद्घाटन व वार्षिक बक्षीस वितरण, माजी विद्यार्थी मेळावा माजी विद्यार्थी मेळावा त्यानंतर हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ७ वाजता शालेय विद्यार्थ्यांची ट्रिकसिनयुक्त बाल दशावतार नाट्य कलाकृती श्री गणेश संतोषी महिमा सादर होणार आहे.
गुरुवारी १८ जानेवारीला सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा माजी विद्यार्थी रामचंद्र पावसकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक जनार्दन सावंत यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्रा.सुहास पाटील, केंद्रप्रमुख राजन वारंग, झाराप सरपंच श्रीमती दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश गावकर उपस्थित राहणार आहेत.