You are currently viewing उद्धवजींच्या विरोधात निकाल दिला तरी देखील शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ सुरू हीच ठाकरे ब्रँडची ताकद – आ. वैभव नाईक

उद्धवजींच्या विरोधात निकाल दिला तरी देखील शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ सुरू हीच ठाकरे ब्रँडची ताकद – आ. वैभव नाईक

*उद्धवजींच्या विरोधात निकाल दिला तरी देखील शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ सुरू हीच ठाकरे ब्रँडची ताकद – आ. वैभव नाईक*

*ओरोस येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश*

राज्यात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून उद्धवजींच्या विरोधात निकाल दिला असताना देखील शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे. हीच ठाकरे ब्रँडची ताकद आहे. हा निकाल राज्यातील जनतेला मान्य नाही. उद्धवजी ठाकरे यांचीच शिवसेना जनतेला मान्य असून जनता उद्धवजींसोबत आहे. आजचा शिवसेना पक्ष प्रवेश हे देखील त्याचे उत्तम उदाहरण असून प्रवेश कर्त्यांचा पक्षात मान सन्मान केला जाईल असे प्रतिपादन आ. वैभव नाईक यांनी केले.
ओरोस येथील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. ओरोस ब्राम्हणवाडी येथील श्री देवी भवानी मंदिर येथे आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
यामध्ये निलेश ओरोसकर, नारायण ओरोसकर, गोविंद ओरोसकर, सुरेश ओरोसकर,आतिश ओरोसकर, राजाराम ओरोसकर, कृष्णा ओरोसकर,महेंद्र परब, विलास ओरोसकर, विनायक ओरोसकर, विशाल ओरोसकर, नम्रता ओरोसकर,राजाराम गावडे, निशा ओरोसकर, आशिष ओरोसकर, साक्षी ओरोसकर, दर्शना ओरोसकर यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
याप्रसंगी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,उपतालुका प्रमुख सचिन कदम, उपतालुका प्रमुख बाळा कोरगावकर, विभाग प्रमुख नागेश ओरोसकर, छोटू पारकर,दीपक आंगणे, बाळू पालव,भगवान परब, सुनील जाधव,अमित भोगेले,योगेश तावडे,रवी कदम, मनीष पारकर,सुशील निब्रे,रोहन सावंत, रवींद्र परब, गणेश तावडे, मामा ओरोसकर, प्रकाश ओरोसकर, रोशन परब आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा