*सुरेल कवितांनी साऊ – जिजाऊ जन्मोत्सवाची सांगता*
पिंपरी
सुप्रसिद्ध कवी, गझलकार आणि संगीतकार विजय वडवेराव यांनी आपल्या आवाजात सादर केलेल्या वैविध्यपूर्ण गेय कवितांनी साऊ – जिजाऊ जन्मोत्सवाची सुरेल सांगता केली. श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव संचलित श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, त्रिवेणीनगर, तळवडे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त साऊ – जिजाऊ जन्मोत्सव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता शुक्रवार, दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी विजय वडवेराव यांच्या कविता – गझल मैफल या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली. श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर, प्राचार्य एस. एस. तिकटे, उपप्राचार्य बी. यू. सातपुते, संचालक के. व्ही. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
“सर्वांना पोटभर अन्न मिळू दे…
अंगभर कपडा, निवारा छान मिळू दे!”
अशी कारुण्यपूर्ण आळवणी करणाऱ्या प्रार्थनेने विजय वडवेराव यांनी आपल्या मैफलीचा प्रारंभ केला. ‘तळपती तलवार जिजाऊ…’ या त्यांच्या रचनेने विद्यार्थ्यांना वीररसाचा प्रत्यय दिला; तर ‘शहरामधून आम्ही एकदा गावामध्ये गेलो…’ या हास्यगीताच्या माध्यमातून त्यांनी आपली फजिती कथन करताना खळखळून हसवले.
“मी बोलताच त्यानं फोडला हंबरडा”
भिडे वाडा बोलला…..!
या गीताच्या उत्कट सादरीकरणाने क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांचा क्रांतिकारी संघर्ष साकार केला. ‘भाकरीचं गाणं’ या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आईच्या हृद्य आठवणींना उजाळा देताना श्रोत्यांच्या काळजाला हात घातला.
“लेक लाडका मी शाळेचा
शाळा माझी आई…”
या गझलेच्या सुरेल आवाजातील सादरीकरणाने वडवेराव यांनी तन्मयतेने ऐकणारे विद्यार्थी आणि आपल्यातील अंतर पुसून टाकले आणि उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला. आपल्या मैफलीची सांगता ‘बाप आभाळाएवढा…’ या कवितेने करून त्यांनी कळसाध्याय गाठला.
प्रमोद जगताप यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या उत्तुंग योगदानाची माहिती दिली.
श्रीमती एस. डी. गणगे प्रशालेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक वंदे मातरम् ने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*