You are currently viewing सुनिल करडे व गणेश नाईक यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड

सुनिल करडे व गणेश नाईक यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड

*सुनिल करडे व गणेश नाईक यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड*

सन २०२३-२४ च्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तर टप्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलगाव नं ४ चे शिक्षक सुनिल करडे यांनी सादर केलेल्या नवोपक्रमाला प्रथम क्रमांक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर खरारे शाळेचे शिक्षक गणेश नाईक यांच्या नवोपक्रमाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने त्यांच्यावर शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘चुकत चुकत इंग्रजी शिकूया कृतियुक्त आनंदायी शिक्षणासंगे’ असा सुनिल करडे यांचा नवोपक्रम होता तर गणेश नाईक यांचा ‘वाचू आनंदे’ हा नवोपक्रम होता. दोघांचेही नवोपक्रम राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम
स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पंर्धा विविध पाच गटात घेण्यात येते. त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक,विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती व अध्यापकाचार्य, पर्यवेक्षीय अधिकारी या गटांचा समावेश आहे. सदर स्पर्धेतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील टप्प्याचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात आले होते. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य सुशील शिवलकर, डॉ. लवू आचरेकर, शाळा मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षण प्रेमी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा