एनसीसीचे 12 ते 21 जानेवारीपर्यंत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
58 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे 12 ते 21 जानेवारी 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅम्पमध्ये 350 मुली व 80 मुले सहभागी होत आहेत. या कॅम्पमध्ये वेपन प्रशिक्षण, फायरिंग प्रशिक्षण, ड्रिल प्रशिक्षण, हेल्थ आणि हायजीन प्रशिक्षण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम एनजीओ- समाजब्ध, फायर फायटिंग, नेत्र तपासणी शिबीर, प्राकृतिक आपदा प्रशिक्षण (आत्मरक्षा), झुम्बा, योगा प्रशिक्षण तसेच 100 मीटर आणि 200 मीटर धावणे, गोळा फेक, कबड्डी, खो-खो हॉलीबॉल, इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या शिबिरामध्ये 36 शाळा व 21 कॉलेज सहभागी होणार आहेत. या शिबीराचे आयोजन, समावेशक अधिकारी कर्नल दिपक दयाल, सेना मेडल यांच्या मार्गदर्शनखाली आयोजीत करण्यात आले आहे.