चराठे येथील बंद असलेले पाईप लाईनचे काम त्वरित सुरु करा…
चराठे ग्रामस्थांची पंचायत समिती पाणी पुरवठा उपविभागाकडे मागणी.
सावंतवाडी
जलमिशन अंतर्गत चराठे गावातील बंद असलेले पाईप लाईनचे काम त्वरित सुरु करा, अशी मागणी चराठे येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग उपअभियंता यांच्याजवळ निवेदनातून करण्यात आली.
या निवेदनात असे म्हटले की, चराठे गावासाठी जलमिशन योजनेतून पाईप लाईनचे काम चराठे ते इन्सुली (बिलेवाडी) या गावापासून मंजूर झाले आहे. मात्र हे काम पूर्ण न करता ठेकेदाराकडून अर्धवट ठेवण्यात आले आहे. काम बंद असल्यामुळे चराठा गावातील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. या गोष्टीचा विचार करून येत्या आठ दिवसात काम सुरु न केल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत चराठे समोर २६ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसणार आहोत, असा इशारा देण्यात आला. यावेळी अमित परब, अमर चराठकर, ओंकार पावसकर, सुनील परब, विलास परब, केल्टस फर्नांडिस, मुकेश परब आदी उपस्थित होते.
संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*