You are currently viewing स्मृति भाग २७

स्मृति भाग २७

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग २७* 

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आपण *व्यास* स्मृतिमधील काही विचारधन पहात आहोत . त्यांच्या स्मृतितील तिसर्‍या अध्यायात पुढील श्लोक येतात .

 

*वाग्दूषितमविज्ञातमन्यपीडितकार्य्यपि ।*

*भूतेभ्योSन्नमदत्त्वा च तदन्नं गृहिणो दहेत् ॥*

वाणीने दूषित , ज्याचे प्राप्तिस्थानाचा पत्ता माहित नाही , जे अन्य कुणास दुःखी करुन प्राप्त केले आहे असे आणि जे प्राण्यांना दिल्याशिवाय अन्न खाल्ले जाते , ते अन्न गृहस्थास दग्ध करते .

केवढा गहन अर्थ समाविष्ट असणारा श्लोक सांगितला महर्षि व्यासांनी !! नमस्कारच !!

चित्रावतीचा उल्लेख करुन पुढे एकाग्र चित्ताने , न बोलता , अन्नाची निन्दा न करता , तृप्तिपर्यंत भोजन करावे , असा उल्लेखही येतो .

*” ॐ सहनाववतु सहनौभुनक्तु सहवीर्यं करवावहै । तेजस्विनावधि तमस्तु मा विद्विषावहे । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।*

हा श्लोक जेंव्हा स्मशानभूमीत वा अन्यत्र श्रद्धांजली देतांना म्हटला जातो , तेंव्हा मला लाज वाटते माझीच ! की मीच योग्य समजावून सांगू शकलो नाही माझ्या बांधवांना याची !! असे तथाकथित अथवा आढ्यताखोर ब्राह्मण काय प्रेतासह वा गतात्म्यासह या क्रिया करणार आहे का ? पण खरं सांगू ? अर्थाचा ( पैशाचा वा धनाचा ) विचार करतांना धर्म सुटतच जातो . म्हणून माझ्या ऋषिंनी धर्म आणि मोक्षात अर्थ आणि कामाचं सँडविच केले आहे ! हे धर्मप्रतिपादकाचा ठेका मिरवणार्‍यांना कळलंच नाही आणि धर्माची काय स्थिती आहे आज आपण पहातच आहोत !! पुढे एक रात्रीसाठी श्लोक सांगून तिसरा अध्याय संपतो .

 

*नातितृप्त उपस्पृश्य प्रक्षाल्य चरणौ शुचिः ।*

*अप्रत्यगुत्तरशिराः शयीत शयने शुभे ॥*

भूक शिल्लक ठेवून जेवण करुन हात पाय तोंड धुवून शुध्द झाल्यावर डोक्यास पश्चिम वा उत्तर दिशेस न करता शुभ शय्येवर शयन करावे .

भूक शिल्लक ठेवावी . शुद्ध व्हावं हातपायतोंड धुवून ! डोकं दक्षिणेस वा पूर्वेस करावे ! आणि शुभ शय्या हा शब्द ! एकाच श्लोकात किती मोजकं सांगितलंय ना ? असं का ? भूक शिल्लक ठेवली की चार ते पाच चे दरम्यान म्हणजे ब्राह्म्य मुहूर्तावर उठण्यास अडचण येत नाही . शुद्ध होवून झोपले तर तळहात व तळपाय धुवून थंड झालेले असल्याने झोप लागण्यास मदतच होते ! करुन पहा . मॅग्नेटिक पोल म्हणजे दक्षिण धृव व उत्तर धृवाच्या गुरुत्वाकर्षणाचा डोक्यावर वा शारिरीक हालचालींवर विपरीत परिणाम होवू नये , म्हणून सांगितले आहे . पुढे शक्तिमान व बुद्धिमान गृहस्थाने ( ही त्यांची शब्दयोजना आहे ! ) व्रतांचे नित्य आचरण करावे ! असे म्हटले आहे .

पुन्हा प्रश्न येतोच !! पण असे श्लोक सांगणारे ऋषि वाईट असतील ?

सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी !🙏🙏

विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

*डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————

♦️ *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*♦️

 

👉 सगळ्यात वेगाने वाढणारी आणि भरपूर पैसा देणारी इंडस्ट्री म्हणजे *फुड इंडस्ट्री* या फुड इंडस्ट्री मध्ये *डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स* मोठया प्रमाणात वापरले जातात.

 

👉 *सॉसेस, केचप, चटण्या, रेडी टू कूक, रेडी टू इट प्रॉडक्ट्स तसेच हॉटेल, बेकरी, आईस्क्रीम, ज्युस, मेडिकल आणि घरगुती वापरासाठी या डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स ना खूप मागणी आहे.*

 

👉 अनेक वेळा उत्पादन जास्त झाल्याने आणि त्याचा उठाव न झाल्याने अनेक भाज्या, फळे यांना दर मिळत नाही आणि त्या खराब होतात, फेकून दिल्या जातात. अशा वेळी डिहायड्रेशन पद्धतीने त्याचा वापर करता येतो, टिकवता येतं, त्यावर प्रक्रिया करून नुकसान टाळून चांगला नफा कमावता येतो.

 

👉 अल्प भांडवलात आणि छोट्याशा जागेतून, अगदी घरातूनही करता येण्यासारखा व्यवसाय म्हणजे *डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स तयार करणे.*

 

♦️ *डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय ?*

♦️ *त्याचा उपयोग काय ?*

♦️ *आपण काय काय डिहायड्रेट करु शकतो ?*

♦️ *त्यातील व्यवसाय संधी काय ?*

♦️ *या व्यवसायाला भवितव्य काय ?*

♦️ *हा व्यवसाय कोण करु शकतो ?*

♦️ *या व्यवसायासाठी गुंतवणूक किती लागेल ?*

♦️ *हा व्यवसाय आम्हाला जमेल काय ?*

असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पडले असतील….🤔

 

🤗सकारात्मक दृष्टिकोन, योग्य मार्गदर्शन आणि कष्ट करायची जिद्द असलेली कोणतीही व्यक्ती हा व्यवसाय करु शकते, आर्थिक उत्पन्न कमवू शकते.🫰🏻💵

 

👉 डिहायड्रेशन प्रॉडक्ट्स तयार करणे हा एक खूप मोठी संधी असलेला व्यवसाय आहे. *पानं, फुलं, फळं, भाज्या, धान्य, औषधी वनस्पती आणि मासे* इत्यादी तूम्ही डिहायड्रेट करु शकता आणि त्यातून खूप चांगला नफा कमवू शकता.

 

*डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*🥬🥦🍆🌽🥒🥭🍌🌽🍍🍤

 

♦️ *19-20-21 जानेवारी 2024 कुडाळ, सिंधुदुर्ग*

 

👉 डिहायड्रेशनचं हे तंत्र, मंत्र, महत्त्व आणि त्याचा उपयोग याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनीतर्फे या 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

👉 अधिक माहितीसाठी कृपया *DHY KDL* हा कोड 8767473919 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप करावा.

 

♦️ *टीम अभिनव*♦️

8767473919

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा