*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*निसर्ग नि अध्यात्माची सांगड..*
खरंच छान विषय आहे. अहो, आपणच निसर्ग आहोत ना?
पण म्हणतात ना? ॥तुझे आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी॥मुळात आमचा जन्मच पंचमहाभुतांपासून होऊन
आम्ही विलय पावतो ते ही पंचमहाभुतातच! जन्म ही निसर्गातून
नि विलयही निसर्गात मग या पेक्षा वेगळा पुरावा काय हवा अजून?”मातीतून मी आले वरती मातीचे मम हे अधुरे जीवन”
इंदिरा संतांच्या ह्या काव्यपंक्ति काय सांगतात? आपण
निसर्गाचाच एक भाग आहोत.तेच आपले अध्यात्म व तेच आपले जीवन आहे नाही का?
“साद देती हिमशिखरे”जी के प्रधान यांच्या या अध्यात्मिक
पुस्तकाचा अनुवाद डॅा.रामचंद्र जोशी यांनी केला आहे, हा अनुवाद काही वर्षांपूर्वी माझ्या हाती लागला नि थरारून व
झपाटून गेले होते मी!.एका बैठकीत हे पुस्तक झपाटल्या सारखे वाचून काढले. ते अजून डोक्यातून गेले नाही. अध्यात्मात माणूस किती वरच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो
हे ते पुस्तक वाचून मला कळले.अर्थात हा ज्याच्या त्याच्या
श्रद्धेचा प्रश्न आहे. काही नास्तिकांना ह्या गोष्टी तद्दन खोट्या
वाटतात.आपले सारे संत, आपल्याला अध्यात्म सांगतांनाच ते
निसर्गाच्या संपर्कात होते नि वरील जे पुस्तक मी म्हणते
त्या घटना साऱ्या हिमालयात घडलेल्या घटना आहेत म्हणजे
निसर्गाच्या संपर्कातील घटना आहेत किंबहुना त्या फक्त तिथे
निसर्ग सानिध्यातच घडू शकतात असे म्हटले तरी चालेल.
जस जसे हिमालयात वर वर जावे तसतसा तो भाग दुर्गम व
अधिक अधिक सुंदर बनत जातो, नव्हे तिथे चिरतारूण्याचे
वरदान आहे असे म्हणतात.आपण खातो ते अन्न ते सेवन करत
नाही, फुलाफळांचा त्यांचा आहार आहे म्हणून म्हातारपण त्यांना स्पर्श करत नाही.अलिकडे या विषयावर माझा एक
विद्यार्थी कृष्णा पवार म्हणून((इंजिनिअर आहे)तो या अध्यात्म
या क्षेत्रात फार पुढे जाऊन दोन पुस्तके त्याने लिहिली आहेत जी बेस्ट सेलर यादीत आहेत.
आपले निवृत्तीनाथ महाराज ब्रह्मगिरी डोंगरात होते तेव्हाच
त्यांना नाथपंथाचा साक्षात्कार मिळाला व तिथेच त्यांनी तप केले.आपले तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेले तिथे तप
फळाला आले व विठ्ठलाचा साक्षात्कार होऊन “आनंदाच्या
डोही आनंद तरंग” उठले. ते म्हणतात,”काय सांगो झाले काहीचीया बाही, आता चाली नाही आवडीने”
आता मी थांबतो, मला पांडुरंग भेटला.आता पुढे जाणे नाही असे तुकाराम म्हणाले.
पंढरीच्या वाळवंटात सारे संत जमत, टाळ मृदुंगाच्या तालावर
नाचत, त्या नंतर ज्ञानेश्वर व नामदेव महाराजांनी भारतभर भ्रमंती केली.नामदेव थेट पंजाबात “ग्रंथसाहेबात” गेले.हा
प्रसंग तीर्थयात्रा व निसर्ग यांचा घनदाट संबंध आहे हेच दाखवतो ना?चराचरात परमेश्वर आहे व त्याचा ठाई ठाई साक्षात्कारही होतो.संत मुक्ताबाई वादळात विलिन झाल्याचे आपण ऐकतो.आपले सप्त चिरंजीव निसर्गात वास्तव्य करून आहेत हा आपला दृढ समज आहे, अश्वत्थामा तर नंदुरबार परिसरात सातपुडा डोंगरात दर्शन देतो असे अनुभव वाचायला मिळतात.
श्रीकृष्ण राधा गोपिका गुरे वासरे बांसरी गाई वृंदावन गोवर्धन
हा सारा निसर्ग चमत्कारच आहे.युमना काठ बांसरी वादन रासक्रीडा कालियामर्दन सारे यमुना काठी घडले.जिथे निसर्ग
आहे तिथे शांतता आहे, एकांत आहे नि माणसाचा स्वत:शी
संवाद आहे. निसर्गात गेल्या शिवाय स्वत:शी संवाद होऊच
शकत नाही, माणूस आंत डोकावून पाहूच शकत नाही.
म्हणून जे जे अध्यात्माकडे वळतात त्यांची पाऊले ही हिमालयात, डोंगरात म्हणजेच निसर्गात वळतात याचा अर्थ
अध्यात्म व निसर्ग यांचा गूढ संबंध आहे.ते एकमेकांना अतिशय पुरक आहेत.अलिकडे नर्मदा परिक्रमेवर बरेच लिखाण व अनुभव कथन माझ्या वाचनात आले व तोही मोठा
चमत्कारच असल्याचे जाणवले.
नि:संग निरपेक्ष कंगाल राहून निसर्गात एकरूप होत पायी पायी
चालत परिक्रमा करायची. रोज नियमित चालायचे. बरोबर काही न्यायचे नाही. पूर्ण परिक्रमेत हजारो किलोमिटर निसर्गाच्या खडतर परिक्षा पाहणाऱ्या खडकाळ काटेरी रस्त्यावरून चालतांनाही काही अपाय होत नाही की कुणी
कधी ही उपाशी रहात नाही. नर्मदा मैयाच साऱ्यांची काळजी
घेते हे अनुभवाला आल्याचे परिक्रमावासी सारेच सांगतात,
प्रत्येकाला अनुभव येतोच. कुणीही उपाशी रहात नाही व संग्रह
ही करत नाही. निसर्गाच्या संगतीत पंगूही चालू लागल्याचे अनुभव मी वाचले आहेत. निसर्गात गेला की माणूस अंतर्मुख
होतो.आंत बघू लागतो व त्याला स्वत:चा शोध लागतो व
परमात्म्याकडे जाण्याची त्याच्याशी एकरूप होण्याची ओढ
बळावते. त्या दिशेने प्रवास होण्याची सुरूवात होऊ शकते इतका निसर्ग प्रभावी आहे.म्हणून मोठमोठे हायली क्वालिफाईड महान शिकलेले लोक सुद्धा नर्मदाकिनारी गेल्यावर तिथेच स्थिरावले एवढा आनंद त्यांना नर्मदा किनारी
मिळतो.म्हणजेच निसर्ग व अध्यात्म यांचा निकट संबंध आहे.
साधू संतांचे सोडा, आपण बाहेर जातो, काश्मिरला, केरळला
कन्याकुमारीला जातो तिथे हा महान निसर्गच आपल्याला भेटतो व घरदार सारे चिंता क्लेश विसरून आपण निसर्गात
रममाण होतो. एक अनामिक असे सुख शांती समाधान त्याला
निसर्गात लाभते म्हणून तर साधू संन्याशासह सामान्य माणूसही निसर्गाला जवळ करतो. केरळच्या चहाच्या मळ्यातून, मुन्नारच्या डोंगरावरून घरी लवकर परतावेसे वाटत
नाही.ध्यानस्थ बसायला झाडासारखी सुंदर जागा नाही.प्र.के अत्रे म्हणतात,निसर्गाच्या सानिध्यात एका झाडाखाली एक
कवितेची वही व मी बस्स! मला आणखी काही नको, इतकी निसर्गाची संगत माणसाला आवडते कारण अध्यात्माचा पर्यायाने परमेश्वराचा साक्षात्कार त्याला तिथे होतो.एक अनामिक असे सुख शांती त्याला तिथे मिळते.निसर्ग गुढ आहे,
ओढ लावणारा आहे, माणसाला तो खेचतो म्हणून नदी किनारे
समुद्र किनारे आपल्याला इतके आवडतात.आपली तेथे भावसमाधीच लागते.काही क्षण माणूस हरवून जातो हे कसले
लक्षण आहे?
आपल्या जीवनाचे चार आश्रम कोणत्या वेळी काय करावे
हे उत्तम प्रकारे सांगतात.वानप्रस्थाश्रम निसर्गात घेऊन जातो
नि नि:संग होऊन संन्यास घ्यायला सांगतो व अध्यात्म आचरण
करायला सांगते आराधना करायला सांगतो.थोडक्यात निसर्गातच माणसाला अध्यात्म गवसते असे दिसते तर..!
निसर्गा इतका आनंद माणसाला कुणीही देऊ शकत नाही हेच
खरे आहे.आणि माणसासाठी निसर्गच अध्यात्म आहे.
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
*संवाद मिडिया*
*डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*
*सविस्तर वाचा👇*
————————————————
♦️ *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*♦️
👉 सगळ्यात वेगाने वाढणारी आणि भरपूर पैसा देणारी इंडस्ट्री म्हणजे *फुड इंडस्ट्री* या फुड इंडस्ट्री मध्ये *डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स* मोठया प्रमाणात वापरले जातात.
👉 *सॉसेस, केचप, चटण्या, रेडी टू कूक, रेडी टू इट प्रॉडक्ट्स तसेच हॉटेल, बेकरी, आईस्क्रीम, ज्युस, मेडिकल आणि घरगुती वापरासाठी या डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स ना खूप मागणी आहे.*
👉 अनेक वेळा उत्पादन जास्त झाल्याने आणि त्याचा उठाव न झाल्याने अनेक भाज्या, फळे यांना दर मिळत नाही आणि त्या खराब होतात, फेकून दिल्या जातात. अशा वेळी डिहायड्रेशन पद्धतीने त्याचा वापर करता येतो, टिकवता येतं, त्यावर प्रक्रिया करून नुकसान टाळून चांगला नफा कमावता येतो.
👉 अल्प भांडवलात आणि छोट्याशा जागेतून, अगदी घरातूनही करता येण्यासारखा व्यवसाय म्हणजे *डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स तयार करणे.*
♦️ *डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय ?*
♦️ *त्याचा उपयोग काय ?*
♦️ *आपण काय काय डिहायड्रेट करु शकतो ?*
♦️ *त्यातील व्यवसाय संधी काय ?*
♦️ *या व्यवसायाला भवितव्य काय ?*
♦️ *हा व्यवसाय कोण करु शकतो ?*
♦️ *या व्यवसायासाठी गुंतवणूक किती लागेल ?*
♦️ *हा व्यवसाय आम्हाला जमेल काय ?*
असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पडले असतील….🤔
🤗सकारात्मक दृष्टिकोन, योग्य मार्गदर्शन आणि कष्ट करायची जिद्द असलेली कोणतीही व्यक्ती हा व्यवसाय करु शकते, आर्थिक उत्पन्न कमवू शकते.🫰🏻💵
👉 डिहायड्रेशन प्रॉडक्ट्स तयार करणे हा एक खूप मोठी संधी असलेला व्यवसाय आहे. *पानं, फुलं, फळं, भाज्या, धान्य, औषधी वनस्पती आणि मासे* इत्यादी तूम्ही डिहायड्रेट करु शकता आणि त्यातून खूप चांगला नफा कमवू शकता.
*डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*🥬🥦🍆🌽🥒🥭🍌🌽🍍🍤
♦️ *19-20-21 जानेवारी 2024 कुडाळ, सिंधुदुर्ग*
👉 डिहायड्रेशनचं हे तंत्र, मंत्र, महत्त्व आणि त्याचा उपयोग याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनीतर्फे या 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
👉 अधिक माहितीसाठी कृपया *DHY KDL* हा कोड 8767473919 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप करावा.
♦️ *टीम अभिनव*♦️
8767473919
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*