You are currently viewing स्मृति भाग २६

स्मृति भाग २६

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग २६*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आपण *व्यास* स्मृतिमधील काही विचारधन पहात आहोत . त्यांच्या स्मृतितील तिसर्‍या अध्यायात पुढील श्लोक येतात .

 

*शूद्राभिशस्तवार्धुंष्यवाग्दुष्टक्रूरतस्करा ।*

*क्रृद्धापविद्धबद्धोग्रवधबन्धनजीविनः॥*

*शैलूषशौण्डिकोन्नद्धोन्मत्तव्रात्यव्रतच्युताः ।*

*नग्ननास्तिकनिर्लज्जपिशुनव्यसनान्विता ॥*

*कदर्य्यस्त्रीजितानार्य्यपरवादकृतानराः ।*

*अनीशाकीर्तिमन्तोSपिराजदेवस्वहारकाः ॥*

*शयनासनसंसर्गवृत्तकर्मादिदूषिताः ।*

*अश्रद्दधानाः पतिता भ्रष्टाचारादयश्च ये ॥*

*अभोज्यान्नाः स्युरन्नादो यस्य यः स्यात्स तत्समः ।*

शूद्र , दोषारोपांनी युक्त , व्याज खाणारे , वाणीने दोषयुक्त ( अभद्र शब्दोच्चारण करणारे ) , क्रूर , क्रोधी , मातापित्यांनी त्यागलेला , दास्यतेच्या बन्धनाने बांधलेले , उग्रवध आणि पशुपक्ष्यांना जाळात फसवून आजीविका करणारे , नट , दारु विक्रय करणारे , उद्धट , उन्मादी , संस्कारहीन , व्रताने भ्रष्ट , नंगे , नास्तिक , निर्लज्ज , चुगलखोर , दुर्व्यसनांनी युक्त , कंजूष , स्त्रियांनी जिंकलेला , दुष्ट , दुसर्‍यांची निन्दा करणारा , कीर्तियुक्त असूनही पराधीन , राजा व देवतांचे धन हरणारा , शय्या—आसन—सङ्गति—वृत्त आणि कर्म आदि विषयात दोषयुक्त , श्रद्धाहीन , पतीत आणि आचाराने भ्रष्ट अशी जी माणसे आहेत त्यांचेकडील भोजन खाण्यायोग्य नसते ! कारण जो ज्याचे अन्न खातो तो त्याचेसमान ( गुणांचा ) होतो .

हे श्लोक प्रचंड विचार करायला लावणारे आहेत . आयुर्वेदातील चरक संहितेत , *” अन्नं वृत्तिकराणां श्रेष्ठम् , उदकमाश्वासकराणाम् “* म्हणजे अन्न हे वृत्ति तयार करते व पाणी तुम्ही जगाल हे आश्वासन देते , अशा अर्थाचा श्लोक आहे . असं एकमेकांना पूरक वाचन मनाच्या खात्रीचे सामर्थ्य वाढवणारे असते ना ? खरंच .

यातील पहिलाच शब्द ” शूद्र ” आहे . तसे मी आगोदरच सांगितल्याप्रमाणे शूद्र हा शब्द आचार—विचार—उच्चारहीन माणसासाठीच वापरलेला शब्द असावा ! कारण मुळात व्यासच पराशर ऋषि व निषादकन्या यांचे अपत्य आहे ! लघुशंकालयात लघुशंका केल्यावर हात पाय वा तोंड न धुणारे आणि तिथे लघुशंका करतांना मोठ्याने हसणारे वा तोंड उघडून थुंकणारे वा मोठ्याने बडबड करणारे सूटबुटातील माणसे सुद्धा मी नजरेखालून घातली आहेत !! चहा प्यायल्यावर वा नास्ता केल्यावर तोंड न धुणारी माणसे वा तंबाखू चोळून त्याच हाताने चहा वा नास्ता देणारी माणसे , तोंडानेच दुधाची पिशवी फोडून चहा बनवणारे , कारमधून उतरुन दवाखान्यात वा इतर ठिकाणी दारिद्र्य रेषेचे कार्ड दाखवणारे , बँकेत दहा लाखाचा चेक लिहिण्यासाठी दुसर्‍याजवळ पेन मागणारे वा विद्यार्थ्याजवळ पेन मागून सही करणारे , हॉटेलमधे उष्ट्या हातानेच कांदा —कोशिबीर—लोणचे घेणारे , वाढलेली रोटी परत करणारे व परत घेणारे , सोशल डिस्टन्सिंग न पाळता तोंडात तोंड घालून बोलणारे , थुंक लावून नोटा मोजणारे वा थुंक लावून पुस्तकाची पाने उलटवणारे ( असे आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनाही आवडत नव्हते ! ) , अशा कितीतरी असंख्य गोष्टीतून माणसांच्या शूद्रतेची उदाहरणे देता येतील ना ? पुन्हा प्रश्न येतोच !! पण असे श्लोक सांगणारे ऋषि वाईट असतील ?

सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी !🙏🙏

विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

*पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६*

*९८२३२१९५५०/८८८८२५२२११*

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩‍💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗

 

*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻‍♀️संधीचा लाभ घ्या🤩

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४

 

*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी

 

♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४

 

*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा

 

👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*

 

👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील

 

👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)

 

👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता

 

👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल

 

👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳

 

👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜

 

👉 *Personal attention with hands on practice*

 

👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗

 

📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा