You are currently viewing कवितेने गावे मानव मुक्तीचे गाणे

कवितेने गावे मानव मुक्तीचे गाणे

*मराठी चित्रपट महामंडळ कोल्हापूरचे सभासद, चित्रपट कलावंत, लेखक कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कवितेने गावे मानव मुक्तीचे गाणे*

————————–

कवितेने उदरातून

जन्म घ्यावा…….

वेदनेच्या पोटी ….!

कवितेने गावू नये……

कधीच उपाशीच पोटी !

 

कवितेने करावी सलगी सहजच दुःखाशी…….!

ठेवावेत संदर्भ नेहमी….

भळभळत्या जखमांशी !

 

कवितेने करू नये

अक्राळत विरोधाभास . !

मांडावेत झोपडीतले…

सौंदर्य अन ..वेदना….. हमखास….. !.

 

कवितेने कधिच नाही

करू कुणात भेदभाव .. !

आज इथे उद्या कुठे….

क्षण शेवटाचा राव….!

 

लाजरे बुजरे होवूच

नये नवख्या कवितेने ..!

डोळ्यातील अश्रुही…..

टिपावेत ओला……. लेखणीने….. !

 

करू नये भेदभाव……

कवितेने जातीपातीत . !

ओतावी माणूसकीची….. शाई शब्द लेखणीत . !

 

कवितेने गावाकुसा बाहेर

फिरावे कधीतरी एकदा !

म्हणजे कळेल तीला……

विषारी वल्ली….. कित्येकदा ……!

 

कवितेने रमू नये……

विरंगुळ्यात श्रुंगाराच्या !

व्यथा कथा दडल्यात…..

काळकुट्ट अंधाराच्या !

 

युगानंयुगे लेखणी ….

रंगली कधी काव्यात . !

कधी लावणीत तर……

कधी गोड अभंगात .. !

 

आता कवितेने मात्र

मांडू नये पुरस्काराचा बाजार…….!

बोलावे कवितेने अन्याय

विषमता अत्याचार……!

 

कवितेने एकांतात कधी

होवू नये बर नागडे…..!

असेल दम शब्दात….

तर भारी भरेल तागडे !

 

कवितेने आता गावे

मानव मुक्तीचे गाणे……!

करावा पुरस्कार नितीचा

येथून फक्त रिकामेच…… जाणे ……!

 

✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽

मनोहर पवार केळवद .

 

*संवाद मिडिया*

 

*डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————

♦️ *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*♦️

 

👉 सगळ्यात वेगाने वाढणारी आणि भरपूर पैसा देणारी इंडस्ट्री म्हणजे *फुड इंडस्ट्री* या फुड इंडस्ट्री मध्ये *डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स* मोठया प्रमाणात वापरले जातात.

 

👉 *सॉसेस, केचप, चटण्या, रेडी टू कूक, रेडी टू इट प्रॉडक्ट्स तसेच हॉटेल, बेकरी, आईस्क्रीम, ज्युस, मेडिकल आणि घरगुती वापरासाठी या डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स ना खूप मागणी आहे.*

 

👉 अनेक वेळा उत्पादन जास्त झाल्याने आणि त्याचा उठाव न झाल्याने अनेक भाज्या, फळे यांना दर मिळत नाही आणि त्या खराब होतात, फेकून दिल्या जातात. अशा वेळी डिहायड्रेशन पद्धतीने त्याचा वापर करता येतो, टिकवता येतं, त्यावर प्रक्रिया करून नुकसान टाळून चांगला नफा कमावता येतो.

 

👉 अल्प भांडवलात आणि छोट्याशा जागेतून, अगदी घरातूनही करता येण्यासारखा व्यवसाय म्हणजे *डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स तयार करणे.*

 

♦️ *डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय ?*

♦️ *त्याचा उपयोग काय ?*

♦️ *आपण काय काय डिहायड्रेट करु शकतो ?*

♦️ *त्यातील व्यवसाय संधी काय ?*

♦️ *या व्यवसायाला भवितव्य काय ?*

♦️ *हा व्यवसाय कोण करु शकतो ?*

♦️ *या व्यवसायासाठी गुंतवणूक किती लागेल ?*

♦️ *हा व्यवसाय आम्हाला जमेल काय ?*

असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पडले असतील….🤔

 

🤗सकारात्मक दृष्टिकोन, योग्य मार्गदर्शन आणि कष्ट करायची जिद्द असलेली कोणतीही व्यक्ती हा व्यवसाय करु शकते, आर्थिक उत्पन्न कमवू शकते.🫰🏻💵

 

👉 डिहायड्रेशन प्रॉडक्ट्स तयार करणे हा एक खूप मोठी संधी असलेला व्यवसाय आहे. *पानं, फुलं, फळं, भाज्या, धान्य, औषधी वनस्पती आणि मासे* इत्यादी तूम्ही डिहायड्रेट करु शकता आणि त्यातून खूप चांगला नफा कमवू शकता.

 

*डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*🥬🥦🍆🌽🥒🥭🍌🌽🍍🍤

 

♦️ *19-20-21 जानेवारी 2024 कुडाळ, सिंधुदुर्ग*

 

👉 डिहायड्रेशनचं हे तंत्र, मंत्र, महत्त्व आणि त्याचा उपयोग याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनीतर्फे या 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

👉 अधिक माहितीसाठी कृपया *DHY KDL* हा कोड 8767473919 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप करावा.

 

♦️ *टीम अभिनव*♦️

8767473919

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा