You are currently viewing स्मृति भाग २५

स्मृति भाग २५

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग २५*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आपण *व्यास* स्मृतिमधील काही विचारधन पहात आहोत . त्यांच्या विवाह विधिवर्णनात पुढील श्लोक येतो .

*सर्वावस्थासु नारीणां न युक्तं स्यादरक्षणम् ।*
*तदेवानुक्रमात कार्यं पितृभर्तृसुतादिभिः ॥*
स्त्रीच्या सर्व अवस्थेत ( शैशव , यौवन व वार्धक्य ) स्त्रीचे रक्षण न करणे उचित नाही ! हे रक्षण अनुक्रमे पिता , पति व पुत्र यांनी करावयासच हवे .
मनुस्मृतितील ज्या श्लोकामुळे भरपूर वादं ग उठतो , त्या श्लोकाचे समाधानासाठी हा श्लोक आज आपण घेतला . नंतर येणार्‍या अध्यायात गायत्री जप , चार ही वेद , इतिहास , पुराणे व उपनिषद इ.चा अभ्यास सातत्याने करावा , या संबंधी काही श्लोक येतात . आतिथ्य वर्णन येते . यात जामाता , स्नातक , राजा , आचार्य , हितैषी व ऋत्विज हे प्रतिवर्ष धर्माने अर्घ्य देण्यायोग्य होत , असे सांगितले आहे . जो स्वतः मधुर भोजन व दुसर्‍यास अमधुर वा अस्वादु भोजन देतो , तो नरकात जातो , हे सांगून ( व्यवहारात अशी भरपूर माणसे डोळ्यास दिसतात ! ) पुढील अति महत्वाचा श्लोक सांगितला आहे .

*गर्भिण्यातुरभृत्येषु बालवृद्धातुरादिषु ।*
*बुभुक्षितेषु भुञ्जानो गृहस्थोSश्नाति किल्बिषम् ॥*
गर्भिणी स्त्री , रोगी , भृत्य ( ज्यांचे भरणपोषण भर्त्याद्वारा म्हणजे गृहसंचालकाद्वारा केले जते ते भृत्य . इथे मी गृहसंचालक हा शब्द वापरला आहे . समूहसंचालकास काय कसरत करावी लागते हे ज्यांना कळले त्यांना गृहसंचालक काही प्रमाणात कळला , असे समजतो ! ) , तसेच लहान मुले , वृद्ध व भुकेलेला यांना दिल्याशिवाय जो गृहस्थ स्वतः भोजन करतो , तो पाप खातो ( अन्न नाही ! ) .
” पाप खातो ” हा केवढा आरोप वा केवढे दूषण ! ( “पुण्य पर उपकार , पाप ते पर पीडा ” ) . खरंच आसुरी वृत्तीचेच लोक असे पाप सेवन करत असावेत ! एकःदा ब्रम्हदेवाने इन्द्रादि देवांचे हातास काठी बांधली व हात कोपरामधे वाकणार नाही अशी काळजी घेतली . तसेच असुरांनाही काठी बांधली . दोघांना वेगवेगळ्या दालनात बसवले . त्यांचेपुढे अन्न ठेवले व सांगितले ” कोण आगोदर संपवते! ” तर देवांचे आगोदर संपले ! कसे ? तर देवांनी एकमेकांना भरवले समोरासमोर बसून !!! आणि राक्षस वा असुर हात न वाकवता आपल्याच तोंडात प्रयासाने ओतत बसले !!! हा फरक देव दानवातील असतो !!! तसेच , मी लहानाचा मोठा माझ्या आजोबांचे सान्निध्यात झालो . त्यावेळेस घरात बारा पंधरा लोकांचा राबता होता . ज्या वेळेस जेवणाची वेळ व्हायची , त्यावेळेस आजोबा घरातल्या प्रत्येकाची जेवणाबद्दल ” खाल्लेले आहे का नाही ? ” अशी चौकशी करावयाचे व जे जेवलेले नाहीत वा काहीच खाल्लेले नाही त्यांना जेवावयास बोलावल्याशिवाय व ते पानावर बसल्याशिवाय स्वतः जेवत नसत , हा त्यांचा शिरस्ता होता ! . पण असे श्लोक सांगणारे ऋषि वाईट असतील ?
सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी !🙏🙏
विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा