मसुरे बागवे हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचा चांदेर- मागवणे येथे क्षेत्रभेट उपक्रम!
मालवण
मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम. जी. बागवे तांत्रिक विध्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मसुरे मागवणे सडा येथे क्षेत्र भेट उपक्रम करत दगडांचे प्रकार आणि आधुनिक कलिंगड शेतीची माहिती घेतली. तसेच वनभोजनाचा आनंद चांदेरवाडी ब्राम्हणदेव मंदिर येथे घेतला. मल्टीस्कील फाउंडेशन मार्फत क्षेत्र भेट आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रगतशिल शेतकरी श्री. गणेश प्रभूचांदेरकर यांच्या कलिंगड शेतीला भेट दिली.मल्टीस्कील विभागाच्या बागकाम व शेती विभागाच्या शिक्षिका प्रतिक्षा पोईपकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीचा आनंद घेतला. गणेश प्रभूचांदेरकर यांनी कलिंगड शेतीबाबत सविस्तर माहिती दिली. प्रतिक्षा पोईपकर यांनी विध्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. यानंतर अमरेश सावंत यांच्या चिरेखाणीला भेट दिली.

विदयार्थ्यांसाठी एकपात्री अभिनय व स्मरणस्पर्धा यांचे आयोजन केले होते. यावेळी श्री. दयानंद पेडणेकर यांनी ट्रॅक म्युझिकवर गाणी सादर केली. मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे, श्री. एस. बी. पिंगुळकर, एस. डी. बांदेकर, बी. एस. टाकूर, के. जी. घाटे, श्रीम. ए. ए. भोगले, श्रीम. व्ही. एस. जाधव, श्री. एस. एस. हळवे, रमेश पाताडे, भानुदास परब, दयानंद पेडणेकर, अनिल मेस्त्री, चरणदास फुकट व मल्टीस्कील विभागाकडून समन्वयक दत्तप्रसाद सांगेलकर, राजेश कांबळी, प्रियांका पेडणेकर व प्रतिक्षा पोईपकर उपस्थित होत्या.