You are currently viewing आचरा येथे घरात घुसून अज्ञात चोरट्यानी वयोवृद्धाला लुटले….

आचरा येथे घरात घुसून अज्ञात चोरट्यानी वयोवृद्धाला लुटले….

आचरा येथे घरात घुसून अज्ञात चोरट्यानी वयोवृद्धाला लुटले

धाक दाखवत दागिने घेतले; दरवाजा बाहेरून बंद करीत केले पलायन

मालवण

येथील मारुतीघाटी रस्त्यालगत असलेल्या घरात वयोवृद्ध एकटाच असल्याचा फायदा उठवत पत्ता विचारण्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या दोन चोरट्यांनी वयोवृद्धाला लुटल्याची घटना काल सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. यामुळे आचरा परीसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती अशी – वृद्धाला धाक दाखवत वृद्धाच्या अंगावरील सोन्याची साखळी, हातातील अंगठी घरातील रोख रक्कम घेऊन वृद्धाच्या घराचा दर्शनी भागाचा दरवाजा बाहेरून कडी लावून बंद करत चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. चोरट्यांचा माग घेण्यासाठी आज श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञाना पाचारण करण्यात आले होते.
वयोवृद्ध मारुती वामन वाडेकर यांची चोरट्यांनी १४ हजार रुपये किंमतीची सुमारे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, ५ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, घरातील अंदाजित रोख ५ हजार रुपये असे सर्व मिळून सुमारे २४ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालाची चोरी झाली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मारुती वाडेकर यांच्या फिर्यादी नुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर हे तपास करत आहेत.
आचरा मारुतीघाटी येथील रस्त्यानजिक असलेल्या घरात वयोवृद्ध मारुती वामन वाडेकर हे एकटेच राहतात नेहमीप्रमाणे ते आपल्या घरात टीव्हीवर बातम्या बघत बसले होते रविवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बंद दार कोणतरी थोठावले. बाहेर आले आहे हे बघण्यासाठी त्यानी अर्धवट दार उघडून बघितले असता दोन इसम उभे होते त्यांनी नाना पाटेकरचा बंगला कुठे आहे अशी विचारणा केली आम्हला बाहेर येऊन पत्ता सांगा असे सांगू लागलेत मात्र वाडेकर हे बाहेर येत नाहीत असे बघून त्या दोन चोरट्यांनी वाडेकर यांना जोरदार धक्का देत आत ढकलून घरात प्रवेश केला व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठी हुसकावून घेतली. त्याना धाक दाखवत घरातील पैसेही देण्यास भाग पाडले. घरात खोल्यांमध्ये शोधाशोध करत त्यांना ढकलून देत घराचे दर्शनी भागाचा दरवाजा बाहेरून बंद करत चोरटे पसार झालेत. या घटनेनंतर वाडेकर यांनी आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कॉल करत झालेली घटना सांगून याची खबर आचरा पोलिसांना दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा