फासकी लावून वन्य प्राणी बिबट्याची केली हत्या; साळिस्ते येथील एकाला अटक
कणकवली
कणकवली तालुक्यातील साळेस्ते येथे वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत वन्य प्राणी बिबट्या अडकून मयत झाला. या संरक्षित वन्यप्राणी बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फासकी लावणाऱ्या साळिस्ते येथील अनिल आत्माराम कणेरे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली उपवनसंरक्षक सावंतवाडी चे नवाकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सोमवार ८ जानेवारी रोजी पहाटे हा गुन्हा घडला होता.
कणकवली तालुक्यातील साळिस्ते येथे फासकीमध्ये वन्यप्राणी बिबट्या अडकल्याचे वनपाल सामाजिक वनिकरण तळेरे यांनी वनपाल फोंडा यांना दुरध्वनीवरुन खबर दिलेवरुन वनक्षेत्रपाल कणकवली, वनपाल फोंडा, देवगड, दिगवळे अधिनस्त कर्मचारी समवेत तात्काळ घटनास्थळी साळिस्ते ता. कणकवली येथे जावुन फासकीत अडकलेल्या वन्यप्राणी बिबट्याची माहिती घेतली. व फासकीत अडकुन मृत झालेल्या मृत वन्यप्राणी बिबट्याचे शव ताब्यात घेतले.
साळिस्ते ता. कणकवली येथील श्री. विलास वरे यांच्या मालकीच्या आंबा बागेच्या क्षेत्राचे संरक्षणाचे काम करणारे मजुर श्री. अनिल आत्माराम कणेरे रा. साळिस्ते यांनी आंबा बागेच्या कुंपणास फासकी लावली होती. त्या फासकीत पहाटेच्या वेळी अंदाजे १० वर्ष वयाचा वन्यप्राणी बिबट्या अडकुन मृत झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी वनविभागास माहिती दिली. त्यानुसार उपवनसंरक्षक सावंतवाडी यांचे व सहाय्यक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सदर मृत वन्यप्राणी बिबट्यास ताब्यात घेवुन पशुधन विकास अधिकारी खारेपाटण श्री. रविंद्र दळवी व पशुधन विकास अधिकारी जानवली श्री. स्वप्नील अंबी यांचेकडुन शवविच्छेदन करुन त्याचे वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवलीच्या आवारात दहन करण्यांत आले.
श्री. अनिल आत्माराम कणेरे रा.साळिस्ते यांनी आंबा बागेत असणा-या कुंपणाला वन्यप्राण्याच्या शिकार करण्याच्या उद्देशाने लावलेल्या फासकीत वन्यप्राणी बिबट्या अडकुन मृत पावल्याने व सदरचा गुन्हा श्री. कणेरे यांनी कबुल केल्याने त्यांचेवर वन्यप्राणी बिबट्याच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याने त्यांचेवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,51 व 52 अन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे.अशी माहिती कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. राजेंद्र घुणकीकर यांनी पत्रा द्वारे दिली आहे.
वरील गुन्ह्याबाबत उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. नवाकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली व मा. सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी डॉ. सुनिल लाड,कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. राजेंद्र घुणकीकर, वनपरिमंडळ अधिकारी फोंडा श्री.धुळु कोळेकर, वनपाल देवगड श्री. सारीक फकीर, वनपाल दिगवळे सर्जेराव पाटील, वनपाल मालवण श्रीकृष्ण परिट व वनरक्षक श्री. अतुल पाटील, रामदास घुगे, सुखदेव गळवे, सिध्दार्थ शिंदे, प्रतिराज शिंदे, अतुल खोत व वनसेवक श्री. दिपक बागवे, चंद्रकांत लाड व साळिस्ते पोलिस पाटिल श्री. गोपाळ चव्हाण व ग्रामस्थ श्री. मोहन भोगले व इतर यांचे उपस्थीतीत कार्यवाही केली.
*संवाद मीडिया*
*सुवर्णसंधी… सुवर्णसंधी…*📢📢
🚗🚕🚗🚕🚗🚕
*माई ह्युंदाई*
*MAI HYUNDAI अविरत सेवेची 25 वर्षे*
*कुडाळ आणि कणकवली मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी..!!*📢
*सेल्स एक्झिक्युटिव – 04 जागा*
(कुडाळ, कणकवली )
▪️पदवीधर, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️6 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.
*ॲडव्हायजर सर्व्हिस – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक) ▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.
*ॲडव्हायजर बॉडीशॉप – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.
*टेक्निशियन – 3 जागा*
▪️आयटीआय (MMV/डिझेल मेकॅनिक), MCVC, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.
*वरील सर्व पदांसाठी फ्रेशर्ससुद्धा अर्ज करु शकतात*
*MAI HYUNDAI*
*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली. उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*
*फोन : 9623245800*
*ई-मेल: hrm@ghatgegroup.com*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121183/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*