परुळे (प्रतिनीधी) :
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन 2023/24 अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेच्या टिमने परुळे बाजार ग्रा.पं. तीला नुकतीच भेट दिली व ग्रा.पं.तीने स्वच्छता विषयक राबविलेल्या विविध उपक्रमाची माहीती घेतली. यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापे) जिप. सांगली शशिकांत शिंदे, प्रकल्प संचालक जनजीवन मिशन किरण सायमोते, गटविकास अधिकारी पं.स. आटपाडी मुक्तेश्वर माडगुळकर, वि. अ. सा. प्र तानाजी साळुंखे, गटविकास अधिकारी नरेगा, अविनाश पाटील, गटशिक्षणाधिकारी आवासो लावण डी. सी.खाडे, वसंत माळी, सुरेश सातवेकर, डी.सी. खाडे, श्रीधर कुळकर्णी, मनिषा पाटील यांसह सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.
यावेळी परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, माजी सरपंच प्रदिप प्रभु यांनी समिती सदस्याचे स्वागत केले. ग्रामसेवक शरद शिंदे यांनी उपस्थितांना माहीती दिली. यावेळी तालुकास्तर प्लॅस्टिक संकलन युनिट काथ्या प्रकल्प प्रक्रिया सांडपाणी प्रकल्प यांसह विविध उपक्रमांना भेट दिली माहिती घेतली. जि.प. सांगली अंतर्गत उपस्थित सरपंच, उपसरपंच यांनी विविध उपक्रमांची माहीती, यातील कोणता प्रकल्प आपल्या गावात राबवता येईल याचा अभ्यास केला व समाधान व्यक्त केले.