*मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी आणि नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांचे आयोजन*
सावंतवाडी :
रविवारी सावंतवाडी येथील शिव उद्यानात मल्लसम्राट केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार चांगलाच रंगला. यात विजेता ठरला तो ओरोस येथील पोलीस सेवा दलात कार्यरत असलेला पैलवान आशिष जाधव तर सावंतवाडी येथील मल्ल रोहित जाधव उपविजेता ठरला. मल्लसम्राट केसरी विजेत्या आशिष जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते मानाची गदा, रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, फेटा प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच श्री. नेक्सन यांच्याकडून रोख रक्कम रुपये ५ हजार आणि प्रोटीनचा डब्बा भेट स्वरूपात देण्यात आला.
महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी आणि नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांनी पुढाकार घेत ‘मल्लसम्राट केसरी’ कुस्ती स्पर्धा २०२४ च आयोजन केलं असून रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभीला आखाड्यात रंगलेल्या सामन्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. महिला व पुरुष गटात या कुस्त्या जोरदार रंगल्या.
‘मल्लसम्राट केसरी कुस्ती स्पर्धा २०२४’ च आयोजन सावंतवाडीत करण्यात आलं होतं. याचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, महिला पॉवर लिफ्टर प्रसन्ना परब, नेमबाज आयुष पाटणकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व कुडाळ येथील ‘ढ’ मंडळींचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी मल्लसम्राट कुस्तीस १९८५ ला सिंधुदुर्गात सुरुवात केली होती. त्यापासून आजतागायत जिल्ह्यात आम्ही कुस्ती जपण्याचा प्रयत्न करत आहोत. नवीन पिढी कुस्तीत उतरताना दिसत आहे. आजच्या स्पर्धेत ते दिसून येत आहे. भविष्यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर प्रमाणे कुस्तीला हिरा देण्याच काम ही सावंतवाडीची माती करेल असा विश्वास ज्येष्ठ कुस्तीपटू व मार्गदर्शक वाय. पी. नाईक यांनी व्यक्त केला. तसेच सिंधुदुर्गातून पैलवान तयार होण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा, येथील मुलांमध्ये ती ताकद आहे. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, असेही नाईक म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी म्हणाले, सिंधुदुर्गात हवं तेवढं पाठबळ मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु, मल्लसम्राट प्रतिष्ठान व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाने यात पुढाकार घेतला आहे. यापुढे कुस्तीपटू युवक-युवतींना प्रोत्साहन अन् पाठबळ देण्याच काम यापुढे निश्चित केलं जाईल. सिंधुदुर्गचा ‘मल्लसम्राट’ राज्यात चमक दाखवेल, असा विश्वासही अशोक दळवी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यानंतर महिला आणि पुरुष अशा दोन गटातील कुस्त्यांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सैनिक पतसंस्थाचे चेअरमन बाबुराव कविटकर, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, गजानन नाटेकर, बाबू कुडतरकर, वाय. पी. नाईक, भारती मोरे, शुभांगी सुकी, निलीमा चलवाडी, परशुराम चलवाडी, समीरा खलील, कौस्तुभ पेडणेकर, सचिन हरमलकर, म. ल. देसाई, नवनाथ भिसे, सचिव ललित हरमलकर, उमाकांत वारंग, दत्तप्रसाद पाटणकर, भारत बेळेकुंद्री, पांडुरंग काकतकर, दाजी रेडकर, गणेश पाटील, सौरभ पाटील, अनिष पाटील, हर्षद मोर्जे, निलेश फोंडेकर, गौरव दळवी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक सचिव ललित हरमलकर यांनी केले तर संपूर्ण स्पर्धेचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार फिजा मकानदार यांनी मानले.
दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर या स्पर्धेस उपस्थित राहून स्पर्धेतील सहभागी कुस्तीगिरांना शुभेच्छा प्रदान केल्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडीच्या युवा शिलेदारांनी मेहनत घेतली. सदर स्पर्धेला जिल्हाभरातील कुस्तीप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचा एकूण निकाल –
*मुलगे -*
४० किलो वजनी गट –
प्रथम क्रमांक: दुर्वास पवार कासार्डे
द्वितीय क्रमांक: तेजस पारकर, करूळ
तृतीय : समर्थ पाटील, आंबोली
४८ किलो –
प्रथम क्रमांक: रुपेश चव्हाण, करूळ
द्वितीय क्रमांक : विश्वास चव्हाण, कासार्डे
तृतीय क्रमांक : पार्थ देसाई कासार्डे
५४ किलो
प्रथम क्रमांक : भावेश मर्ये, करूळ
द्वितीय क्रमीक : मयुरेश जाधव, सावंतवाडी
तृतीय क्रमांक : श्लोक मर्ये, कासार्डे
६० किलो
प्रथम क्रमांक: तेजस दळवी, सावंतवाडी
द्वितीय क्रमांक: संधर्म पाटील, आंबोली
तृतीय : यशदिप जाधव कणकवली
६८ किलो –
प्रथम क्रमांक : नागेश सावंत कणकवली,
द्वितीय क्रमांक: बाळू जाधव कासार्डे
तृतीय क्रमांक : प्रथमेश राठोड, सावंतवाडी
७४ किलो
प्रथम क्रमांक – गजानन माने कासार्डे
द्वितीय क्रमांक- कौशल पार्सेकर आंबोली,
तृतीय क्रमांक: कौशल पार्सेकर आबोली
८० किलो
प्रथम क्रमांक – आशिष जाधव, ओरोस, (मल्लसम्राट केसरी विजेता)
द्वितीय – रोहित जाधव सावंतवाडी
तृतीय – योगेश रावल, सावंतवाडी
*मुली-*
३५ किलो
प्रथम क्रमाक : तन्वी पारकर, करूळ
द्वितीय क्रमांक : दुर्वा पाटील कासार्डे
तृतीय क्रमांक : सानिका घाडी, देवगड
४० किलो
प्रथम क्रमांक : पल्लवी शिंदे, करूळ
द्वितीय क्रमांक : कुंजल गावकर, वाडा ता. देवगड
तृतीय क्रमांक: सना शेख कासार्डे
४४ किलो
प्रथम क्रमांक :-कस्तुरी तिरोडकर, करूळ
द्वितीय क्रमांक : रिद्धी परब, कासार्र्डे
तृतीय क्रमांक : भार्गवी गांवकर, वाडा – देवगड
४८ किलो
प्रथम क्रमांक : कोमल जोईल, करूळ
द्वितीय क्रमांक : साक्षी तेली, कासार्डे
तृतीय क्रमांक: विधी चव्हाण, कासार्डे.
५४ किलो
प्रथम क्रमांक : प्रतिक्षा गावडे, सावंतवाडी.
द्वितीय : अंजली महाडीक देवगड
तृतीय :-आसावरी तानावडे, कासार्डे
६० किलो
प्रथम क्रमांक : महेक शेख, करूळ,
द्वितीय क्रमांक:- यशशश्री सावंत – भोसले, ओरोस
तृतीय : श्रावणी साईम, देवगड
*संवाद मिडिया*
*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵
*Advt Link👇*
————————————————–
📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢
🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯
घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊
*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶
🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰
👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*
👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*
😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇
▪️इरकली कॉटन साडी
▪️इरकली सिल्क साडी
▪️मधुराई कॉटन साडी
▪️खादी कॉटन साडी
▪️धारवाड साडी
▪️मधुराई सिल्क साडी
▪️सेमी पैठणी साडी
▪️खादी सिल्क साडी
▪️खादी वर्क ड्रेस
▪️पटोला ड्रेस
▪️टॉप पीस
▪️गाऊन
▪️सोलापूर चादर
▪️बेडशीट
▪️नॅपकिन
▪️सतरंजी
▪️पंचा
▪️वूलन चादर
▪️टॉवेल
▪️दिवाणसेट
▪️प्रिंटेड बेडशीट
▪️पिलो कव्हर
▪️लुंगी
▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट
▪️कुर्ता
▪️बंडी
💁🏻♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️
📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻
प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶♂️🚶🏻♀️
स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी
📱संपर्क : 9325329105 / 9860890774
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*