भांडुपगाव वारकरी संप्रदाय मंडळ तर्फे भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन
मुंबई –
“विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम” असा जयघोष करीत भांडुपगाव वारकरी संप्रदाय मंडळातर्फे समस्त परमार्थ भाविकांना विठूरायाचे भांडुप नगरीत दर्शन व्हावे आणि ज्ञानेश्वरी पारायण, सामुदायिक हरिपाठ, कीर्तन, प्रवचन यांचा लाभ घेता यावा यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी भव्य किर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यांचे आयोजन केले आहे. दि. १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत सार्वजनिक पुजा समिती, स्व. दिना बामा पाटील रंगमंच, उत्कर्ष मंडळ व जय हनुमान मैदान भांडुपगाव (पूर्व) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन खासदार संजय राऊत, खासदार मनोज कोटक, माजी खासदार संजय दिना पाटील, आमदार सुनील राऊत, कामगार नेते परशुराम कोपरकर, भाऊ जगताप, माजी नगरसेविका सौ. सारिका मंगेश पवार यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. सध्याच्या अस्थिर व अशांत जिवनात सुख, शांती लाभण्यासाठी तसेच कौटुंबिक व सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी देशप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम व संस्कृती जतन व्हावी व एकात्मता नांदावी या उद्देशाने उपरोक्त मंडळाच्या वतीने गुरुवर्य ह. भ.प. श्री. संतोष महाराज सावरटकर भागवताचार्य यांच्या प्रेरणेने, कुशल मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील थोर किर्तनकारांच्या अमृतमय वाणीतून होणाऱ्या ज्ञानदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष ह.भ.प. विनोद माऊली शिंदे व सचिव दत्ताराम माऊली पालेकर यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
*आता आपल्या सिंधुनगरीत*
कणकवली येथे
*OMG it’s CNG*
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच
ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी
महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
आणि
*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस
*प्रती किमी ₹.४/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
आणि
तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.
*एस.पी.ॲाटोहब*
कणकवली
*7377-959595*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121195/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*