*शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने महाविद्यालय प्रमुखांची नियुक्ती करा
– जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख*
*सिंधुदुर्ग*
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयाचा कारभार स्वतंत्र ठेवण्याची मागणी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात वैद्यकीय महाविद्यालय सूरू करण्यात आलेले आहे. या महाविद्यालयात श्रीमती रामानंद यांची महाविद्यालयाच्या प्रमुख (Dean) म्हणून शासनाने नियुक्ती केली होती. परंतू त्यांच्या मनमानी कारभारामुळे जिल्हा रुग्णालयात अनागोंदी माजून गरीब सर्वसामान्य रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा रुग्णालय जोडल्यामुळे महाविद्यालयाच्या प्रमुख आणि जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांच्यातील बेबनावामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुख श्रीमती रामानंद यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पूर्वी ज्या सुविधा जिल्हा रुग्णालयात मिळत होत्या त्या सुविधा मिळत नव्हत्या, शस्त्रक्रिया होत नव्हत्या.आता शासनाने याची दखल घेऊन त्यांची बदली केल्याचे समजले. या बद्दल शासनाला धन्यवाद देतो असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले असून श्रीमती रामानंद यांची बदली झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली असून त्या रिक्त जागेवर शासनामार्फत कोणाचीही नियुक्ती न झाल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय काम ठप्प झाले आहे. तरी या रिक्त जाग्यावर तातडीने नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे तसेच शासनाचे वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभाग हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय वेगवेगळे ठेवण्यात यावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा रुग्णालय जोडल्यापासून पूर्वी ज्या सुविधा जिल्हा रुग्णालयात मिळत होत्या त्या सुविधा रुग्णांना मिळत नाहीत. तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखांची तातडीने नियुक्ती करावी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय वेगळे ठेवण्यात यावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*