You are currently viewing अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार देवयानी त्रिंबक आजगावकर यांना प्रदान.

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार देवयानी त्रिंबक आजगावकर यांना प्रदान.

*अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार देवयानी त्रिंबक आजगावकर यांना प्रदान.*

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल आचरेच्या जी. टी. गावकर शिक्षण नगरी सभागृहात सौ. देवयानी त्रिंबक आजगावकर, शाळा पेंढ-याचीवाडी वेंगुर्ले यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी चंद्रशेखर हडप हे होते. तर व्यासपीठावर दत्तात्रय हिर्लेकर गुरुजी, सदानंद कांबळी, सुगंधा गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गौरी पटनाईक, कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर, सुरेश गावकर, मोहन गावकर, नवनाथ भोळे, तातू कुबल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या वतीने सत्कार मूर्ती देवयानी आजगावकर यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व रोख पाच हजार रुपये असा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना चंद्रशेखर हडप म्हणाले, *”कथामाला पुरस्कार मिळणे ही शिक्षकाची खरी कमाई आहे. कथामालेने गौरविलेल्या सर्व शिक्षकांचे कार्य हे आदर्श व साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित असेच आहे.”*
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुरेश ठाकूर यांनी सेवामयी शिक्षक पुरस्कार व कथामाला मालवणच्या विविध कार्याचा आढावा घेतला.
निवड समितीच्या वतीने सदानंद कांबळी यांनी सदर पुरस्कार निवडीची प्रक्रिया कथन केली. सुरेश गावकर यांनी कै. जी. टी. गावकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा ओघवत्या शैलीत आढावा घेतला.
आजगावकर कुटुंबीयांच्या वतीने त्रिंबक आजगावकर यांनी देवयानी आजगावकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक व कौटुंबिक योगदानाबद्दल माहिती दिली. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा ही मनातील भावना कथामाला, मालवणच्या रूपाने पूर्ण झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या वतीने वजराट सरपंच अनन्या पुराणिक व साईशा पाटील यांनी तर शिक्षकांच्या वतीने मुकुंद काळोजी यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना सौ. देवयानी आजगावकर म्हणाल्या, *”शैक्षणिक कारकिर्दीमध्ये समाज व पालकांचे उत्तम सहकार्य लाभले आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून विद्यार्थ्यांच्या विकासाचा विचार करून कार्य करत राहिले. त्यातूनच चांगले विद्यार्थी व चांगले काम घडल्याचे समाधान मिळाले. कथामालेने दिलेल्या पुरस्कारामुळे केलेल्या कामाची पोचपावती मिळाली.”*
यावेळी कथामाला मालवणचे गेल्या नऊ वर्षातील पुरस्कार विजेते परशुराम गुरव, गुरुनाथ ताम्हणकर, विजय चौकेकर, चंद्रकांत माने, कल्पना मलये, रश्मी आंगणे, श्रुती गोगटे, रामचंद्र वालावलकर यांचे अनघा कदम यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, लक्ष्मणराव आचरेकर, प्रकाश पेडणेकर, मनाली फाटक यांनीही आजगावकर मॅडमचा सत्कार केला. कोमसाप मालवणच्या वतीने अनिरुद्ध आचरेकर व सदस्य यांनी, कणकवली शिक्षकांच्या वतीने रश्मी आंगणे कल्पना मलये यांनी, हिर्लेकर गुरुजी, चंद्रहास हिर्लेकर यांनी आजगावकर मॅडम यांचा सत्कार केला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला शिवराज सावंत, चंद्रशेखर धानजी, संजय परब, अमृता मांजरेकर , अनघा कदम, तेजल ताम्हणकर, सायली परब, विनोद कदम, भावना मुणगेकर, मधुरा माणगावकर, उज्वला धानजी कथामाला मालवणचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग कोचरेकर यांनी केले तर विजय चौकेकर यांनी आभार मानले.

संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा