भंडारी समाजाने आपली एकजूट घट्ट ठेवावी – नवीनचंद्र बांदिवडेकर
भंडारी समाज मंडळातर्फे आयोजित वधू वर सूचक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.
सावंतवाडी
कष्ट, जिद्द व प्रामाणिकणाचे दुसरे नाव म्हणजे भंडारी समाज. भंडारी समाज हा लढवय्या समाज आहे. भंडारी समाजाने आपली एकजूट घट्ट ठेवावी. मायनक भंडारी, भागोजी शेठ कीर ही समाजाची अस्मिता आहे. लग्न जमवताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लग्न जमवतानही तडजोड करायला शिका. प्रत्येकाने समाजाची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी येथे केले.
सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळातर्फे आयोजित केलेल्या वधू वर सूचक व स्नेह मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून बांदिवडेकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग हे होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, माजी अध्यक्ष अतुल बंगे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजू कीर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, माजी नगरसेवक सुधीर अडिवरेकर, माजी जि प अध्यक्ष मधुमती बागकर, माजी जिल्हा परिषद सभापती सौ शर्वानी गावकर, माजी जि. प. सदस्या उन्नती धुरी, मंडळाचे तालुका सचिव दिलीप पेडणेकर, उपाध्यक्ष देविदास आडारकर, संतोष वैज, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रा. संजय खडपकर, देवगड तालुकाध्यक्ष हेमंत कलांगुटकर, पेडणे तालुकाध्यक्ष उमेश तलवणेकर, हळदणकर, समता सूर्याजी, प्रतिभा कांबळी, ज्ञानदीप राऊळ आदी उपस्थित होते.
बांदिवडेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महेश सारंग म्हणाले, जिल्ह्यात मराठा समजनानंतर सर्वात मोठ्या संख्येने भंडारी समाज आहे. लवकरच समाजाच्या सर्व्हे चे काम हाती घेण्यात येणार आहे. समाज बांधवांना रोजगार देणे हा एकमेव उद्दिष्ट यामागे आहे. विविध शासनाच्या योजना जिल्हा बँक कर्ज योजना समाज बांधवापर्यंत पोचविण्याचे उद्दिष्ट आहे. युवा पिढी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार असल्याचे सारंग म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा सौ सुषमा प्रवीण मांजरेकर यांचा त्यांच्या आई वडिलांसह विशेष सन्मान करण्यात आला . जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गौरवी पेडणेकर, बाळा आकेरकर, प्रास्ताविक गुरुनाथ पेडणेकर यानी केले. मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष अरविंदेकर यांनी तर आभार प्रवीण मांजरेकर यांनी केले. यावेळी ३५० हून अधिक वधू वरांनी नोंदणी केली होती.कार्यक्रमाचे नियोजित उद्घाटक शिक्षणमंत्री दीपक केसरकर महत्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने त्यांच्या वतीने माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, नंदू शिरोडकर, आबा केसरकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.