You are currently viewing मुंबई विद्यापीठ कोकण विभाग आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा 2023-24

मुंबई विद्यापीठ कोकण विभाग आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा 2023-24

मुंबई विद्यापीठ कोकण विभाग आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा 2023-24

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी संघ विजयी.

सावंतवाडी

मुंबई विद्यापीठ कोकण विभाग ( रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा) आंतर महाविद्यालयीन क्रिकेट
स्पर्धा 2023-24 कोकण विभाग क्रीडा समिती व स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण यांनी दिनांक 17/ 12/ 2023 ते 5/1 / 2024 रोजी बोर्डिंग मैदान मालवण व सावंतवाडी नगर परिषद क्रिकेट मैदान येथे आयोजित केली होती.नगरपरिषद सावंतवाडी मैदान येथे दिनांक 5/1 / 2024 रोजी अंतिम सामना जे .एस. एम. अलिबाग विरुद्ध श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी या या दोन संघांमध्ये झाला.नाणेफेक जे एस एम अलिबाग या संघाने जिंकत प्रथम गोलंदाजी करणे पसंत केले.श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने प्रथम फलंदाजी करीत 237 धावा जमविल्या.238 धावा जमवताना श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी संघाचा कर्णधार राजाराम गवस यांने 116 धावा केल्या तर शुभम लाखे यांनी 43 धावा केल्या. सातव्या गाड्यासाठी 139 धावांची भागीदारी करीत संघाची धावसंख्या 237 पर्यंत पोहोचविली.प्रतिपक्ष संघास 238 धावांचे आव्हान दिले.प्रत्युत्तर फलंदाजी करताना जे.एस.एम अलिबाग संघाने सर्व गाडी बाद 141 धावा केल्या.श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या संघातील गोलंदाज राजाराम गवस याने चार गडी बाद केले तर नागेश रेगे यांने तीन गडी बाद केले व संघासाठी विजयी खेळी केली.हा सामना पाहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सीनेट सदस्य युवराज लखमसावंत भोंसले हजर होते.स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघ यांना त्यानी चषक व प्रमाणपत्र वितरित केले.याप्रसंगी श्री एल एम सावंत ,स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.ए. ठाकूर, डॉ. हंबीरराव चौगुले उपस्थित होते.
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या संघास महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व मुंबई विद्यापीठ कोकण विभाग क्रीडा समितीचे सचिव प्रा. चंद्रकांत नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले,कार्याध्यक्षा
राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले,कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले,युवराज्ञी सौ.
श्रद्धाराजे भोंसले,संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, संचालक प्रा. डी टी देसाई सहसंचालक अॅड.श्यामराव सावंत, सदस्य डॉ.सतीश सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य व मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. डी एल भारमल यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा