*ना. दीपक केसरकर यांच्याकडे मागणी*
*ना.दिपक केसरकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट; मनिष दळवी यांनी केले स्वागत*
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :
सिंधुनगरी येथील पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नंतर त्यांनी लगतच असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्याशी त्यांनी जिल्ह्यातील सहकार चळवळी बाबत व सहकार विकासाबाबत चर्चा केली. शासनाचे नाविन्यपूर्ण असलेल्या सिंधू रत्न योजनेत नोडल एजन्सी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला संधी द्यावी अशी मागणी ही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी नामदार दीपक भाई केसरकर यांच्याकडे केली. केंद्र शासनाचा उद्योग विभाग एम एस एम इ, राज्य शासनाच्या विविध कर्ज योजनेत नोडल एजन्सी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक काम करत असून त्याचप्रमाणे सिंधू रत्न योजनेतही या जिल्हा बँकेला काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती ही मनीष दळवी यांनी ना. दीपक केसरकर यांच्याकडे केली शालेय शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करताना सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष मनिष दळवी,यांनी केले. त्यांच्या समवेत संचालक महेश सारंग, रविंद्र मडगांवकर, विठ्ठल देसाई, विद्याधर परब उपस्थित होते सिंधुदुर्ग रत्नगिरी जिल्ह्याच्या कृषी व कृषी संलग्न योजनेमार्फत तसेच पर्यटनावर आधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सिंधू रत्न समृद्धी ही पथदर्शी योजना सुरू केली.सिंधू सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३०० कोटीचा निधी पुढील तीन वर्षात होणार आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करावी. शासन निर्णयानुसार शासन निधीची रक्कम काही निवडक बँकामार्फत ठेवण्यास मान्यता दिलेली असून दिली असून या यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश आहे. सिंधू रत्न समृद्धी योजना अंतर्गत प्राप्त निधी जिल्हा बँकेकडे वर्ग करावा अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दीपक केसरकर यांच्याकडे केली.
यावेळी दिपक केसरकर यांनी जिल्हा बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला व जिल्हा बँक अध्यक्ष माननीय मनिष दळवी यांनी केलेल्या कामकाज व प्रगती बाबत समाधान व्यक्त केले. बँकेच्या पुढील प्रगतीसाठी व वाटचालीसाठी त्यांनी यावेळी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांना शुभेच्छा दिल्या यापुढे आपलं जिल्हा बँकेला सहकार्य राहील असे यावेळी दीपक केसरकर यांनी सांगितले.यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच बँकेचे अधिकारी उपस्थित होते