You are currently viewing आम्ही कामाला पूर्ण न्याय देतो का?नसल्यास का?

आम्ही कामाला पूर्ण न्याय देतो का?नसल्यास का?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*आम्ही कामाला पूर्ण न्याय देतो का?नसल्यास का?*

 

मी अगदी लहान होते, आठ नऊ वर्षांची असेन. आई ने मला

घर झाडायला सांगितले.खेड्यातले मातीचे सारवलेले घर.

मला एवढंच कळत होतं झाडू पुढे पुढे न्यायचा म्हणजे घर

झाडणं. आईला बघायचे ना मी. पण ती झाडतांना काना कोपऱ्यातील केर काढते व तो पुढे पुढे नेते हे थोडीच कळत

होते मला! मग मी एक झाडू इकडे व एक झाडू तिकडे, असे

चार पाच वेळा केले नि मला वाटले मी माझ्या कल्पने प्रमाणे

घर झाडले, झाले. आईने पाहिले, रागावली नाही की बोलली

नाही, म्हणाली, झाले झाडून? मी म्हणाले, होऽऽऽ !

बिचारीने नेहमी प्रमाणे झाडू हातात घेतला नि छान झाडून

काढले, नेहमी प्रमाणे…

 

आता हा प्रसंग मी का सांगितला? मी घर नीट झाडले नाही

कारण तेवढी माझी समज नव्हती म्हणून पण आज वाटते

त्यानंतर वयात आल्यावर, समज आल्यावर मी असे थातुर

मातुर एकही काम केले नाही. कारण तो आईने न रागवता

केलेला संस्कार होता. तिच्या कृतीतून मी तो पाहिला होता. काम कसे करावे या विषयीचा तो धडा होता. कोणतेही काम

सुरूवातीला नीट येत नाहीच हो.तो अनुभुतीचा अनुभवाचा

भाग असतो. तीच गोष्ट घर शेणाने सावरण्याचे. तिचे बघून

बघून मी शिकले. शेणाचा गोळा सालदार आणायचा. जवळ

लोट्यात पाणी घ्यायचे. थोडे थोडे पाणी टाकत तळहाताने

पसरवत ते शेण पुढे पुढे ओढत दोन पायांवर बसत सारवायचे

हे हळू हळू कळत गेले नि मग मी झाडणे सारवणे यात एवढी

पटाईत झाले की मला माझ्या शिवाय कुणाचे झाडणे सारवणे

रंग देणे पटत नसे व मी ते कुणाला करू देत नसे कारण..

 

“ ते माझे घर होते” ही भावना इतकी दृढ होती की माझे घर

सुंदर दिसावे, असावे हे मला मनापासून वाटत असे.”

 

मंडळी, ज्या घरात माझा जीव गुंतला होता तसेच आपले आणखी एक घर आहे, ते म्हणजे आपला देश. माझ्या घरा

प्रमाणेच जेव्हा देश मला प्रिय वाटेल त्याच दिवशी मी माझ्या

घरा सारखे मना पासून प्रेम करू शकेन. मला एका प्रश्नाचे

उत्तर द्या की, असे आपल्या घरा सारखे प्रेम आपण आपल्या देशावर करतो का? करत नसू तर का? मातृभूमी आणि माता सारख्याच

प्रिय हव्या ना? आपण आईवर प्रेम करतो, कुटुंबियांवर प्रेम

करतो तसे प्रेम देशावर केले तर…? कुठल्या कुठे जाईल हो

आपला देश? करोडोंच्या संखेने आपण ह्या भूमीवर राहतो.

त्याच्या दुप्पट हातांनी काम ते ही अंगमोडून, केले तर विचार

करा आपला देश कुठे राहील?

 

पण नाही हो, आपण असे वागत नाही हो? का वागत नाही आपण असे? आपण कोणतेच काम नीट करत नाही. मला

आठवतात त्या जुन्या पिढ्या. कुठले बाळकडू मिळाले होते

त्यांना? देशासाठी फासावर गेलेले वीर आठवून पहा.. ते केवळे

तरूण ब्रिटिशांचे फटके खात हसत हसत फासावर गेले त्यांची

ती जिगर आज आमच्यात का उरली नाही? कुठे गेले ते टिळक

सुभाष बाबू सावरकरांचे प्रेम व देशभक्ती? देशासाठी मरमिटणाऱ्या या विरांकडून देशभक्तिही

आम्ही शिकणार नसू व देशाच्या उन्नती साठी झटणार नसू

तर या देशात राहून साऱ्या सोयी सुविधा उपभोगण्याचा तरी

आम्हाला काय अधिकार आहे?

 

सारेच शिक्षक मनलावून काम करतात का? आम्ही ही शिक्षक होतो पण पूर्ण न्याय दिला आम्ही आमच्या व्यवसायाला! एक

दिवसही कामचुकारपणा केला नाही की कंटाळा केला नाही.

आम्हाला आमच्या बापजाद्यांनी शिकवणच अशी दिली होती

की आम्ही रस्ता सोडून जराही भरकटलो नाही, म्हणून आजही

रस्त्यावर माझे विद्यार्थी भेटले की पायांवर लवतात व त्यांच्या

डोळ्यात तोच आदर व प्रेम दिसते.पूर्ण साडे अठ्ठाविस वर्षात

माझ्या नावावर एक ही मेमो नाही. मला वाटते, अहो पगार घेतो आपण! मग मन लावून काम करायला काय हरकत आहे?

 

पण मला खूप ठिकाणी निराशाजनक चित्र दिसते. कॅालेज

मधील साठ ते सत्तर टक्के प्राध्यापक कामाची टाळाटाळ

करतांना मी विविध शाखांमध्ये काम करतांना अनुभवले आहे.

वर्गात उशिरा जायचे. मग वर्गात विद्यार्थीच नाहीत हे कारण

सांगून स्टाफरूम मध्ये चकाट्या पिटत बसायचे.खरोखर अशाने मानसिक समाधान मिळते का हो? मी म्हणते काम न करता त्या दिवशी फुकटचे जेवण यांना गिळवते कसे?बरं,

स्टाफरूम मध्ये काही वाचतील, लायब्ररीत जातील असे ही

नाही. ही निष्क्रियता मनाला टोचत कशी नाही. यांची मने इतकी मुर्दाड कशी?अशाने कसे विद्यार्थ्यांचे भले होणार हो?

पर्यायाने तुम्ही देशाचा पैसा खाऊन देशाशी गद्दारीच करणार ना? देशाचे भावी आधारस्तंभ घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर असतांना तुमची ही निष्क्रियता देशाचे कसे भले

करणार ? मग तुमचे देशावर नाही पैशांवर प्रेम आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.

 

सरकारी ॲाफिसात आनंदी आनंद आहे. टेबला खालून पैसे

दिल्याशिवाय कागद सरकतच नाही याचा अनुभव मुलाचे काही सर्टिफिकेट कलेक्टर कचेरीतून मिळवतांना मला ही आला. वरून म्हणे हे पैसे आम्हाला वरतीच द्यावे लागतात

म्हणे! सारी यंत्रणाच पोखरली आहे हो? त्यामुळेच मुंडें सारखे

अधिकारी कुठल्याच जिल्ह्यात टिकू दिले जात नाही.

बाबू मंडळी ॲाफिसात गेल्या गेल्या चहाला जातात. वास्तविक घरून ते जेवण करून निघालेले असतात. दोन

फाईली इकडून तिकडे फिरताच लंच ब्रेक होतो तो तासाभराचा

असतो. पुन्हा दोन फाईली फिरवल्याकी टी ब्रेक होतो.गेला

पाऊण तास त्यात. आणि पाचच्या आधीच आवरा आवरीला

सुरूवात होते व लोकलचे वेध लागतात.आठ तासांचा पगार

मोजून घेतांना मनाला जराही क्लेश होत नाही का हो?

कुठे आहे आमचे देशप्रेम व कामावरची निष्ठा?अशाने कसा पुढे जाईल हो देश?

 

आश्रम शाळांची परिस्थिती अतिशय दयनिय आहे. ८/१५ दिवस शिक्षक तिथे जातच नाही.खोटी हजेरी लावतात.

आश्रम शाळेत शिकणाऱ्या एका मुलीने शाळा सोडल्याचे

सांगताच मी तिला (९वीत शिकणारी)शाळा का सोडली

विचारताच तिने व तिच्या आईने जे उत्तर दिले ते ऐकून तर

मी हाबकूनच गेले ( जे मी इथे लिहू ही शकत नाही) व शिक्षकी

पेशाची मला अत्यंत लाज वाटली व शरमेने माझी मान खाली

जाऊन मी हळहळले. शिक्षणच बंद पडल्यामुळे तिचे भविष्यच

उद्धस्त झाले ते वेगळेच!

 

जपान व जर्मनीत लोकांना काम कमी करा सांगावे लागते.

गेले चार महिने मी यु के त असतांना ८ तास अंग मोडून काम

करतांना मी लोकांना पाहिले. व ॲान लाईन काम करणाऱ्यां

कडूनही त्यांचा बॅास पुरेपुर काम करवून घेतो.माझा मुलगा स्वत: बॅास असून पूर्ण आठ तास काम करूनच(बॅास असल्याची सवलत न घेता)घरी परतत असे.जर्मन बाई ट्रेन

मधील शिट फाटलेले दिसताच सुई दोरा काढून तिथल्या तिथे

शिवते याला देशप्रेम म्हणतात. आम्ही सारा स्पॅांज काढून घरी

आणला असता? एवढे लालची का आहोत आपण? चार

महिन्यात एकही हॅार्न वाजलेला मी ऐकला नाही, किती ही ट्रॅफिक जॅम असला तरी, फक्त ॲम्बूलन्सला फटाफट जागा

करून देत जागच्याजागी थांबतात.कमालीची शिस्त! आमच्या

पेक्षा तर मेंढरं बरी, ते तरी शिस्तीत चालतात!

का आम्ही देशावर प्रेम करत नाही? आम्ही आमच्या निष्ठा

कुठे गहाण टाकल्या आहेत?

 

 

हा सगळा विचार करतांना मनाला अत्यंत क्लेश होतात. देशावर जेव्हा संकट येते किंवा

नैसर्गिक आपत्ती ओढवते तेव्हा मात्र चमत्कार व्हावा तसे आम्ही एकत्र येतो.देश प्रेमाला जणू उधाण येते? पण ते तात्पुरते! एरव्ही सर्व काम सरकारने करावे. आम्ही फक्त मागण्या करणार ते ही काम न करता? मला मनापासून वाटते

की हे सारे चित्र बदलायला हवे.आपल्या देशासाठी काम करतांना आपलाच प्रचंड फायदा आहे व आपल्याच मुलांचे

भवितव्य घडणार आहे मग कधी होणार हे परिवर्तन ?

सरकार नावाची कोणी व्यक्ति नाही, आपणच सरकार आहोत.

मग आपल्या घरापासूनच सुरूवात करू या नि शपथ घेऊ या

की मी माझ्या देशासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करेन,

व माझ्या देशाचे भविष्य घडवेन तरच या भारतभूला उज्वल

भवितव्य आहे. खूप बोलले मंडळी तळमळीने, आता थांबते.

 

आणि हो, ही फक्त माझी मते आहेत.

 

खूप खूप धन्यवाद..

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

 

 

*संवाद मिडिया*

 

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

 

*Advt Link👇*

————————————————–

📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

 

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

 

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

 

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

 

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

 

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*

 

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

 

▪️इरकली कॉटन साडी

▪️इरकली सिल्क साडी

▪️मधुराई कॉटन साडी

▪️खादी कॉटन साडी

▪️धारवाड साडी

▪️मधुराई सिल्क साडी

▪️सेमी पैठणी साडी

▪️खादी सिल्क साडी

▪️खादी वर्क ड्रेस

▪️पटोला ड्रेस

▪️टॉप पीस

▪️गाऊन

▪️सोलापूर चादर

▪️बेडशीट

▪️नॅपकिन

▪️सतरंजी

▪️पंचा

▪️वूलन चादर

▪️टॉवेल

▪️दिवाणसेट

▪️प्रिंटेड बेडशीट

▪️पिलो कव्हर

▪️लुंगी

▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट

▪️कुर्ता

▪️बंडी

 

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

 

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

 

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

 

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

 

📱संपर्क : 9325329105 / 9860890774

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा