You are currently viewing स्मृति भाग २२

स्मृति भाग २२

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग २२*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण *व्यास स्मृति* पहाणार आहोत . यात चारच अध्याय आहेत .
१) धर्माचरणदेशप्रयुक्तषोडशसंस्कारवर्णनम् । यात एकूण बेचाळीस श्लोक आहेत .
२) विवाहविधिवर्णनम् । यात छप्पन्न श्लोक आहेत .
३) स्नानादिविधि पूर्व्हाण्हकृत्यवर्णनम् । यात त्र्याहात्तर श्लोक आहेत . शेवटचा अध्याय एक्काहात्तर श्लोकांचा असून
४) गृहस्थाश्रमप्रशंसापूर्वकतीर्थधर्मवर्णनम् । या नावाचा आहे .
यात वर्णविभाग , अनुलोम व प्रतिलोम भिन्न जातींची संज्ञा , कर्म , संस्कार , विवाह , गृहस्थधर्म , स्त्रीधर्म , गृहस्थाचे नैमित्तिक कर्म , तीर्थधर्म , दानधर्म व सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळते .
आता आपण व्यास स्मृतिमधील काही श्लोक पाहू .

*श्रृतिस्मृतिपुराणानां विरोधो यत्र दृश्यते ।*
*तत्र श्रौतं प्रमाणस्तु तयोर्द्वैधे स्मृतिर्वरा ॥*
जेथे श्रृति , स्मृति व पुराणे यात परस्पर विरोध असेल तिथे श्रृतिंचे वचन प्रमाण मानावे व स्मृति आणि पुराणात मतभेद असतील तर स्मृतिवचन प्रमाण मानावे .
हा श्लोक देण्याचा उद्देश खासच आहे . कारण हा श्लोक जेंव्हा माहित असेल तेंव्हा विचारवंत वा ब्राह्मणांमधील संवाद वितंडात परिवर्तित होणार नाही ! अशी आशा बाळगतो .

*विद्वेषमथ पैशुन्यं हिंसनञ्चार्कवीक्षणम् ॥*
*तौर्यात्रिकानृतोन्मादपरिवादानलङ्क्रियाम्।*
*अञ्जनोद्वर्तनादर्शस्रग्विलेपनयोषितः ॥*
*वृथाटनमसन्तोषं ब्रह्मचारी विवर्जयेत् ॥*
ब्रह्मचारी मुलाने ( गुरुकुलातील शिष्यांनी ) शत्रुता , चुगलखोरीपणा , हिंसा , सूर्याकडे कारणाविना व्यर्थ पाहणे , नाचणे , गाणे वाचवणे , खोटे बोलणे , उन्माद , परनिन्दा , अलङ्कारधारण , नेत्राञ्जन—उद्वर्तन ( अंगास उटी लावणे ) —आरशात सतत पाहणे — माला — लेप —स्त्रियांसह ( मुलींसह सुध्दा ) व्यर्थ फिरणे आणि असन्तोष यांचा त्याग करावा .
गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी कसे वागावे ? याचे छान वर्णन आजच्या काळाच्या किती विरुद्ध वाटते ना ? वर वर्णन केलेले बव्हंशी गुण आजच्या विद्यार्थ्यांमधे असतातच ! याला कारण अशिक्षित मनुष्यबळ जेंव्हा सरकारात असेल तेंव्हा त्याचे परिणाम कधीच चांगले येणार नाहीत ! अशिक्षित ठीक पण असंस्कारित असेल तर ! गेल्या सत्तर वर्षात हेच झाले भारताचे इतिहासात !! सगळी उत्तम व आदरणीय व्यक्तिमत्वे डावलली गेली आणि घराणेशाही म्हणण्यापेक्षा राजेशाही पद्धतीने लोकशाही चालवली गेली . एक पिढी जर सरकारात असेल तर त्याचेनंतर दोन पिढ्या टाळूनच त्यांना सरकारात स्थान द्यावे , असे वाटते . ठीक आहे . आपला विषय गुरुकुल !
गुरुकुलात राजासुद्धा पादत्राणे आश्रमाचे बाहेर काढून एक एक कोस गुरुंपर्यंत चालत गेल्याचे दाखले आहेत ! सगळे गुरुकुल ऋषिच चालवत होते . राजासुद्धा एक कोस ऋषिंना भेटण्यासाठी अनवाणी चालणे ही एकच गोष्ट आमच्या ऋषिंची शक्ति दाखवते . रामायणातील एक प्रसंगच पुरेसा आहे यासाठी ! विश्वामित्र रामलक्ष्मणास दशरथाजवळ मागायला येतात व दशरथ नकार देतो ! तेव्हा वशिष्ठ दशरथाला आज्ञाच देतात की पाठवावे त्यांना विश्वामित्राकडे , दशरथ हतबलतेने पाठवतो ! ही शक्ति !
माझ्या वडिलांनीही गुरुकुल सुरु केले होते पण काही स्थानिक राजकारण्यांनी ते पुढे बंद कसे पडेल याची उत्तम काळजी घेतली ! त्यांची एक आठवण . मी लहान होतो दहावी अकरावीत असेल ! ते सांगायचे , *” जेव्हा लवकुशांनी वाल्मिकिंचे आश्रमात शिष्य म्हणून प्रवेश केला तेंव्हा वाल्मिकिंचे आश्रमातून सगळे विद्यार्थी आश्रम सोडून जावू लागले ! ही तेजस्विता लव कुशांची होती ! विश्वामित्रांचे आश्रमात दोनच विद्यार्थी ! पण जगज्जेते झाले ! येवढेच नाही तर नाव युगानुयुगे ! राम श्रीराम ! “* मग मी विनोदाने म्हणायचो , ” मी कुठे अवतार आहे ? आणि तुम्ही पण उत्तमाची मागणी करायला हवी होती ? जशी मागणी तसा पुरवठा केला देवाने ?” 😂😂आणि दोघे ही हसायचो !!
सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी !🙏🙏
विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

 

*Advt Link👇*

————————————————–

📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

 

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

 

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

 

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

 

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

 

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*

 

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

 

▪️इरकली कॉटन साडी

▪️इरकली सिल्क साडी

▪️मधुराई कॉटन साडी

▪️खादी कॉटन साडी

▪️धारवाड साडी

▪️मधुराई सिल्क साडी

▪️सेमी पैठणी साडी

▪️खादी सिल्क साडी

▪️खादी वर्क ड्रेस

▪️पटोला ड्रेस

▪️टॉप पीस

▪️गाऊन

▪️सोलापूर चादर

▪️बेडशीट

▪️नॅपकिन

▪️सतरंजी

▪️पंचा

▪️वूलन चादर

▪️टॉवेल

▪️दिवाणसेट

▪️प्रिंटेड बेडशीट

▪️पिलो कव्हर

▪️लुंगी

▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट

▪️कुर्ता

▪️बंडी

 

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

 

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

 

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

 

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

 

📱संपर्क : 9325329105 / 9860890774

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 14 =