You are currently viewing ओटवणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पालकमंत्रांच्या यांच्या हस्ते संपन्न

ओटवणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पालकमंत्रांच्या यांच्या हस्ते संपन्न

सावंतवाडी :

 

ओटवणे ग्रामपंचायत चा अनेक वर्षांचा नविन इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आणि ओटवणे गावची सुसज्ज ग्रामपंचायत उभी राहिली. या ओटवणे ग्रामपंचायती च्या नूतन इमारतीचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सिंधुदूर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक भाई केसरकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटन प्रसंगी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा देताना गावशी आपल नात हे भावनिक आहे.त्यामुळे गावाला विकासात कधीच निधी कमी पडणार नाही.आपण विकासाकडे कधीही राजकारण करत नाही जे आहे ते समोर त्यामुळे गावच्या विकासासाठी भरघोस निधी दिला जाईल त्यातच या गावाशी राजकारण पलीकडचे नाते आहे. उद्घाटनासाठी आपण संध्याकाळचा वेळ दिला होता मात्र माझं अचानक सकाळी येण्याच ठरलं तरीही ग्रामस्थांनी हे मान्य करत कार्यक्रमात बदल केला आपल आदरातिथ्य केल या बद्दल आपण ऋणी असल्याच्या भावना व्यक्त केल्या. आपणाला केव्हाही हक्काने हाक मारा आपण तत्पर असेन असे सांगितले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक भाई केसरकर यांनीही बोलताना या इमारतीच्या उर्वरित कामासाठी मी निधी दिला भविष्यात या ग्रामपंचायत च्या सभोवताली प्लेविंग ब्लॉक बसविण्यासाठी निधी आपणाकडून देण्यात येईल. गावच्या विकासात कुणीही राजकारण न करता राजकीय पादत्रणे बाहेर ठेवत एकीने गावचा विकास साधूया असे मत व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार राजन तेली,सरपंच आत्माराम गावकर उपसरपंच संतोष कासकर, सावंतवाडी नगरपालिका माजी नगराध्यक्ष संजू परब , भाजप जिल्हाध्यक्ष्य प्रभाकर सावंत,शिवसेना शिंदेगट जिल्हाध्यक्ष अशोक दळवी,तालुकाध्यक्ष नारायण ऊर्फ बबन राणे , विकास भाई सावंत, जिल्हा बँक संचालक महेश सारंग,रवीन्द्र म्हापसेकर, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, प्रशांत बुराण, ग्राम.सदस्या मनाली गावकर, समीक्षा गावकर, संजना जाधव, लावण्या तावडे, अस्मिता भगत, उमेश गावकर, संतोष तावडे, सगुण गावकर, माजी सरपंच उत्कर्शा गावकर, ग्रामसेवक आरती चव्हाण, ग्रामसेवक रावुळ, उमेश म्हापसेकर, जयगणेश गावकर, प्रभाकर गावकर, विश्वनाथ बोरये आदि मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामरमथांच्या मागणीने ओटवणे ग्रामपंचायत साठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक भाई केसरकर यांनी निधी पुरविला. निधि अभावी या इमारतीच काम रखडल होत. त्यानंतर या इमारतीचं उर्वरित काम पूर्ण करतं सुसज्ज अशी इमारत पूर्णत्वास नेण्यात आली. सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या कारकीर्दीला वर्ष होण्याच्या अगोदर हे काम पूर्णत्वास नेले. या भव्य दिव्य इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. उद्घाटन संपन्न झाल्यानंतर सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद रात्रौ भजन त्यानंतर दशावतर नाटय प्रयोगाने या संपुर्ण दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा