You are currently viewing तिमाही ई आर 1  विवरणपत्र 31 जानेवारीपर्यत ऑनलाईन भरा

तिमाही ई आर 1  विवरणपत्र 31 जानेवारीपर्यत ऑनलाईन भरा

तिमाही ई आर 1  विवरणपत्र 31 जानेवारीपर्यत ऑनलाईन भरा

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाचे मनुष्य बळाचे डिसेंबर 2023 या तिमाहीचे ई आर 1 हे विविरणपत्र 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन  पध्दतीने भरण्याचे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ग.पां. चिमणकर यांनी केले आहे.

               सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय/ निमशासकीय/ खासगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर 1 प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकार आहे. डिसेबर 2023 रोजी संपलेल्या तिमाईचे विवरणपत्र ई आर 1  https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर  दि. 31 जानेवारी 2024 पर्यत ऑनलाई पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक/ आस्थापना विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील अशांनी सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02362 228835 मोबा. 9421262085 वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा