*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*कर्मयोग ज्याचा त्याचा*
मी अमेरिकेत मुलीजवळ असतानाची एक गमतीदार गोष्ट! माझी नात तिच्या रूम मधून माझ्याजवळ येऊन बसली. मी तिला सहज म्हटलं,” अगं तुझ्या रूममध्ये दिवा चालू आहे.”
ती काय करते हे माझ्या लक्षात यायच्या आतच तिने हातात रिमोट घेतला आणि म्हटलं,
“हे गुगल! माझ्या स्टडीतला लाईट बंद कर.”
थोड्यावेळाने किचन मधून माझी लेक बाहेर आली. तिनेही हातात रिमोट घेतला.
“ हे गुगल! बरोबर आठ मिनिटांनी मला गॅस बंद करायची आठवण कर.”
आणि काय सांगू? ही सगळी कामं google ने अगदी वेळच्यावेळी, तत्परतेने पार पाडली.
एकदा तर तो नातीला असंही म्हणाला,” माफ कर मला. तुझा प्रश्न कळला नाही. परत सांग.”
हे सारं नवलच नाही का?
पण खरं सांगू मला हा गुगल सेवक खूपच आवडला.तो कदाचित आपल्याला आळशी बनवत असेल पण तूर्तास हे बाजूला ठेवूया.
तत्पर, कर्तव्यदक्ष, स्वतःची काम चोखपणे करणारा हा गुगल.
मग मी थोडी विचारांमध्ये भरकटले. या गुगल सारखाच सेवा तत्पर, आपलं काम हे आपलं कर्तव्य समजून करणारा माणूस, आजकाल फार क्वचितच का दिसतो?
मला निवृत्त होऊन आता पंधरा वर्षे झाली असतील. मी ४० वर्षे नॅशनलाईज्ड बँकेत नोकरी केली आणि त्या माझ्या कामाच्या ठिकाणच्या, माझ्या सह कर्मचाऱ्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, अनेक आठवणी आजही माझ्या मनात आहेत.
ऑफिसच्या भिंतीवर लिहिलेलं असायचं.CUSTOMER IS GOD. एखादं हसतमुख नमस्कार करणार्या सुंदर स्त्रीचं पोस्टर असायचं ज्यावर लिहिलेलं असायचं “आम्ही आपल्याच सेवेसाठी” वगैरे.(आजही अनेक ठिकाणी असे फलक दिसतातच.फक्त नावापुरते.)
मुद्दा असा की याच देवासमान ग्राहकाला क्षुल्लक कारणांसाठी दहा हेलपाटे मारावे लागले आहेत. अनेक वेळा त्यांच्या समस्या सहजपणे दूर करण्यासारख्या असताना त्यांना विनाकारण अधिक अडचणीत टाकण्यात काय गंमत वाटायची कोण जाणे! पुष्कळ वेळा “हे काम माझे नाही दोन नंबरच्या विंडोवर जा, तिथूनही तो बिचारा मागे पुढे फिरत राहिलेला पाहून वेदना व्हायच्या. या कारणास्तव माझी अनेकांशी भांडणे झाली आहेत त्यावर “मॅडम! तुम्हाला इतकं वाटतं ना तर तुम्ही बसा करत ही कामे. थांबा आणखीही माझ्या टेबलवरचं पेंडिंग पाठवतो तुमच्याकडे.”
तर असं.. आ बैल मुझे मार..
माझा मुळीच असा दावा नाही की मी एक आदर्शवादी कर्मचारी होते.पण सद्सदविवेकबुद्धीशी प्रामाणिक असण्यात प्रयत्नशील नक्कीच होते.
परंतु ही बेफिकिरी, कामचुकारपणातला आनंद, समोरच्या माणसासाठी काही करणं म्हणजे कर्तव्य न मानता उपकार केल्यासारखी वर्तणुक दाखवणे.आणि जर कोणी तक्रारीचा सूर काढलाच तर त्याला उर्मटपणे,” काय करायचं ते करा. करा हो तक्रार “कंसात हमारा कुछ नही बिगडता ही भावना बाळगणं यानं नक्की काय साधतं?
हे काम माझं आहे, मी या कामासाठी बांधील आहे आणि मी केलेली उत्तम कामगिरी ही माझ्या देशाचा विकास करणारी असणार आहे आणि पर्यायाने यातून एक देशवासी म्हणून माझाच फायदा होणार आहे हीच मानसिकता खूप महत्त्वाची असतानाही ती घडत नाही हे शल्य आहे. *सबका साथ सबका विकास* हे फक्त बोलण्यापुरतच नको तर प्रत्यक्ष कृतीतही हवं.
सामान्य नागरिकाला काही कामासाठी, त्या कामाशी निगडित असलेल्या ठिकाणी जाताना आपले काम नक्की होईलच असा विश्वास वाटत नाही. ही विश्वासार्हता नसणे हे जितके वैयक्तिक सुरक्षिततेसाठी धोक्याचे तितकेच राष्ट्रासाठीही अपायकारक आहे. कारण यातूनच मग अराजकता, दंगली,मारामार्या असंतोष, आंदोलने, संप, हिंसाचार बळावतो आणि राष्ट्राची अंतर्गत शांतता,सुरक्षितता बिघडते आणि परिणामी बाहेरची राष्ट्रे या कमकुवतपणाचा गैरफायदा उठवू शकतात. पर्यायाने सीमावाद भडकतो, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचे अंतिम गंभीर परिणामही अनेक आहेत. जसे की टंचाई, महागाई, भ्रष्टाचार, बेकारी, गुन्हेगारी, देशाची आर्थिक घडी कोसळणे आणि हे केवळ जे काम आपले आहे जिथे आपण काम करतो, काम छोटे अथवा मोठे हे सापेक्ष नाहीच, काम कुठलेही असो पण त्याची अंमलबजावणी चोखपणे होत नसेल, बांधिलकीच्या भावनेतून होत नसेल तर मग हे सर्व गंभीर घातक परिणाम केवळ वैयक्तिक पातळीवर न राहता राष्ट्रीय पातळीवरचे होतात.
प्रत्येक व्यावसायिकाच ठरलेलं काम असतं. डॉक्टरचं रुग्णाविषयीच प्रामाणिक कर्तव्य, इंजिनीयरचं त्याच्या तांत्रिक ज्ञानाशी १००% प्रामाणिक राहणं, वास्तुशास्त्रज्ञाने इमारत बांधताना बाय लाॅज पाळणे,वकिलाने कायदा आणि न्याय याचे संतुलन राखणे, पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेचा विचार करणे, इतकच नव्हे तर या कृतिशील कर्तव्य सदरांमध्ये अनेक आहेत. सुतार, शिंपी, सोनार, गवंडी, गिरणी कामगार कितीतरी. या सर्वांकडून अपेक्षित एकच आहे कर्तव्य बुद्धी, प्रामाणिकपणा, पारदर्शी व्यवहार आणि हेच माझे काम आहे ही भावना.
अगदी घरातल्या गृहिणीचे सुद्धा काम ठरलेले आहे. तिला एक सुजाण,सुसंस्कारी सक्षम पिढी घडवायची आहे आणि त्याकरिता आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करून देशासाठी उत्तम नागरिक बनविणे हे तिचेही कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यापासून तिने कधीही रेसभर ढळू नये ही अपेक्षा आहे.
जपान, जर्मनी,कोरिया, इंडोनेशिया सारखे नेस्तनाबूत झालेले देश प्रगतीच्या वाटेवर जाताना जेव्हां आपण पाहतो तेव्हा मन प्रश्नांकित होते” आपण का नाही?”
आणि त्याचे उत्तर आपण जिथे काम करतो त्याला पूर्ण न्याय देतो का? या प्रश्नात आहे. उत्तर “हो” असेल तर आनंद आहे पण नाही असेल तर भविष्य भयंकर आहे.
कृष्णा ने ही अर्जुनाला सांगितले होते,” तू क्षत्रिय आहेस आणि युद्ध हा तुझा धर्म आहे. चल उठ आणि शस्त्र हाती घे.”
अर्जुनाची बाजू धर्माची होती आणि अधर्माशी त्याची लढाई होती ती जर त्याने नाकारली असती तर राज्य केवळ अधर्माचे उरले असते आणि रयतेच्या सुख शांतीसाठी ते धोक्याचे होते.
तेव्हा प्रत्येकाचं कार्य हे ठरलेलं आहे. त्याला नियमांची चौकट आहे आणि त्या नियमांचे काटेकोर पालन करणे ही कर्त्याची महत्त्वाची भूमिका आहे त्यापासून ढळणे म्हणजे फक्त विनाशाकडे जाणे यात शंकाच नाही…
*राधिका भांडारकर*
*संवाद मिडिया*
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗
*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻♀️संधीचा लाभ घ्या🤩
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४
*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी
♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४
*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा
👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*
👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील
👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)
👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता
👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल
👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳
👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜
👉 *Personal attention with hands on practice*
👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗
📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*