वेंगुर्ला :
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार वेंगुर्ले नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष राजन गिरप यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सावंतवाडी विधानसभा प्रमुख व मा.आम.राजन तेली यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
भाजपा महाराष्ट्र आयोजीत “नमो चषक” भव्य क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या वेंगुर्ले तालुक्याच्या नियोजनाची बैठक मा.आम.राजन तेलीसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा मोर्चा व बेसिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी रेडी, उभादांडा, तुळस, आडेली, म्हापण इत्यादी पाच जि. प.मतदार संघात व वेंगुर्ले शहरात स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. तसेच विविध समीत्या स्थापन करून जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी श्री प्रसन्ना देसाई (जिल्हा उपाध्यक्ष), श्री सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष), जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, सत्याविजय गावडे (अनसुर सरपंच), श्री सुनील मठकर ,श्री गणेश मनोहर गावडे (शक्ती केंद्र प्रमुख), श्री प्रितम जगन्नाथ सावंत, श्री तुषार साळगांवकर, प्रसाद कृष्णा पाटकर (तालुकाध्यक्ष युवा मोर्चा), श्री बंड्या पाटील (पालकरवाडी सरपंच), श्री नितीन चव्हाण (ता.चिटणीस), माजी सभापती श्री निलेश सामंत, क्रिडा प्रकोष्ठ निशांत तोरसकर, नमो चषक संयोजक हेमंत गावडे, श्री हितेश धुरी, श्री बाबली वायंगणकर (तालुका सरचिटणीस), ता.चिटणीस समीर कुडाळकर, श्री वैभव होडावाडेकर(तुळस युवा मोर्चा), श्री भूषण सारंग, महीला मोर्चाच्या सौ वृंदा गावंडळकर, श्री भूषण आंगचेकर, श्री प्रणव वायंगणकर (युवा मोर्चा),श्री शशिकांत करंगूटकर, श्री रुत्विक आंगचेकर, बुथप्रमुख सुधीर पालयेकर, सोशल मिडीयाचे श्रीकृष्ण(राजू) परब व अमेय धुरी, बुथप्रमुख शेखर सुरेश काणेकर ,आसोली उपसरपंच संकेत संदीप धुरी, शक्तिकेंद्र प्रमुख श्यामसुंदर मुननकर, श्री मारुती दोडानशेट्टी, श्री विष्णू परब (सरपंच अध्यक्ष), श्री रविंद्र शिरसाट, श्री हर्षद साळगावकर, श्री कमलेश गावडे व श्री जगन्नाथ राणे (शक्ती केंद्र प्रमूख) इत्यादी उपस्थित होते.