दानापूर – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)
कै.श्यामराव सार्वजनिक वाचनालय दानापूर येथे मातृदिनानिमित्ताने महाराष्ट्रातील श्रेष्ठ व ज्येष्ठ कवयित्री रेषा आकोटकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली भव्य काव्यसंमेलन आणि श्रेष्ठ व ज्येष्ठ कथाकार श्री. सुरेश आकोटकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण संपन्न झाले.
ह्यावेळी “एक पणती उजेडासाठी” या वाचनालयाचे आद्य संस्थापक स्वातंत्र्य सैनिक कविवर्य राष्टशिक्षक लोकनेते गुरुवर्य स्व. बापूसाहेब ढाकरे ह्यांच्या स्मृतिग्रंथातील योगदानबद्दल लेखकांचे ज्येष्ठ कवी श्री.रमेश मगरे ह्यांचे शुभ हस्ते सत्कारही घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन डाॅ.प्रा. वृषाली मगरे ह्यांचे शुभ हस्ते संपन्न झाले. कविसंमेलनात डाॅ. अशोक शिरसाठ, गणेश साखरे,प्रविण हटकर,शिवराज जामोदे,अमोल गोंडचवर, आतिष सोसे,रमेश मगरे,सुरेश आकोटकर, प्रतिमा इंगोले,वृषाली मगरे,ह्यांनी सहभाग घेतला. ह्यावेळी बालकलाकार चि.स्वराज सोसे ह्याचा श्री.दास गोविंद महाराज यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
डाॅ. रेषा आकोटकर ह्यांना मातृस्मृती पुरस्कार आणि श्री.रमेश मगरे, डाॅ. किरण डोंगरदिवे, डाॅ मा.ग.गुरव,आणि भूपाळी निसळ ह्यांना स्व.बापूसाहेब ढाकरे वाड्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तके,आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ह्या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्य सैनिकांचे वारस श्री.एकनाथराव तिडके सहकुटुंब हजर होते. सौ.लताताई तिडके यांनी वाचनालयाला देणगी दिली.ह्या कार्यक्रमात दास गोविंद महाराजांनी गजानन महाराजांच्या भूमिकेत हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. समारोप श्री.सुरेश आकोटकर ह्यांनी केला तर श्री.चंद्रशेखर पेठे सर यांनी आभार मानले.