You are currently viewing अन्नदान श्रेष्ठदान लाभार्थींना मोफत आरोग्यसेवा पुरवणार – आयुक्त ओमप्रकाश दिवटे

अन्नदान श्रेष्ठदान लाभार्थींना मोफत आरोग्यसेवा पुरवणार – आयुक्त ओमप्रकाश दिवटे

इनामकडून ३१ डिसेंबरचा खर्च टाळून २१ हजारांची मदत

 

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

इचलकरंजी नागरिक मंच,बिजनेस पॉईंट ग्रुप व जेंटलमन ग्रुपतर्फे १हजाराव्या दिवसाकडे वाटचाल सुरू असलेल्या अन्नदान श्रेष्ठदान चळवळीतील सर्व लाभार्थ्यांना इचलकरंजी महापालिकेच्या वतीने आरोग्यसेवा मोफत पुरवणार असून भविष्यातील औषधांची तरतूदही केली जाणार असल्याचे मत इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी व्यक्त केले.

इचलकरंजी नागरिक मंचच्या ३१ डिसेंबरच्या खर्चास फाटा देत अन्नदान योजनेस मदत करणारा उपक्रम स्तुत्य असून भविष्यात अशा सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संघटनांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले.मनोगतात त्यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन करत भविष्यात शासनस्तरावरील योजनेत या उपक्रमाचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत कोरोनाच्या अगदी खडतर कालावधीत सुरू केलेल्या या उपक्रमाद्वारे आपण ५० जणांचे आधारस्तंभ झाला आहात ,असे सांगून त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

स्वागत व प्रास्ताविक अभिजित पटवा यांनी केले.मनीष मुनोत व उमेश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन आयुक्तांचे स्वागत केले.गोळा झालेल्या रक्कमेतून २१ हजार रुपयांचा धनादेश वैभवी निगुडगेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

इचलकरंजी शहरातील गरजू निराधार नागरिकांसाठी इचलकरंजी नागरिक मंच,बिजनेस पॉईंट ग्रुप व जेंटलमन ग्रुप मार्फत ५० नागरिकांना रोज दोनवेळचे डबे पोहोच करण्याचा उपक्रम गेल्या ९८० दिवसांपासून अविरतपणे राबवत आहे.सदर उपक्रमाद्वारे ज्या नागरिकांना मोफत मिळालेले जेवणही जाऊन घेता येत नाही त्यांच्यासाठी घरपोहोच जेवण पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच २० कुटुंबांना दर महिन्याला मासिक पुरेल इतके किराणा सामान देण्यात येते.

इचलकरंजी नागरिक मंच ही नागरिकांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणून इचलकरंजी शहरात परिचित आहे.३१ डिसेंबरच्या नियोजनातील काही रक्कम अन्नदान श्रेष्ठदान उपक्रमास देण्यात येते. संघटनेत सर्वसामान्य नोकरदारांपासून ते डॉक्टर,वकील,पत्रकार,व्यापारी,

उद्योजक,इंजिनियर अशा

सर्व क्षेत्रातील नागरिकांचा समावेश आहे.अन्नदान श्रेष्ठदान उपक्रमास रोजचा अंदाजे ४००० रुपये खर्च असून ३१०० रुपये प्रमाणे एका दिवसाची रक्कम तर वार्षिक सहयोगी सदस्य स्वरूपात प्रति महिना १०००प्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये स्वीकारले जातात.या व्यतिरिक्त इच्छेनुसार १ रुपयांपासून कितीही रक्कम स्वीकारली जाते.वरील उपक्रमात मदतीसाठी व अधिक माहितीसाठी अभिजित पटवा – 9921600800, दिपक निंगुडगेकर (शुभम) – 9975436969, हर्षल बोरा – 9028800260, संजय डाके – 9850091201, मनीष मुनोत –  9822023444, शितल मगदुम – 9822255112, सौ वैशाली बाबर – 9049068792 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. यावेळी उदयसिंह निंबाळकर,अतुल आंबी,वैशाली बाबर, संजय डाके,अमित पटवा,दयानंद लिपारे,रविंद्र भंडारी आदी उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩‍💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗

 

*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻‍♀️संधीचा लाभ घ्या🤩

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४

 

*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी

 

♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४

 

*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा

 

👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*

 

👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील

 

👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)

 

👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता

 

👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल

 

👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳

 

👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜

 

👉 *Personal attention with hands on practice*

 

👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗

 

📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा